Success Story: लेकीसाठी आईने नोकरी सोडली, लॉकडाउनमध्ये ऑनलाइन अभ्यास करुन UPSC क्रॅक; IAS जागृति अवस्थी यांचा प्रवास

Success Story of IAS Jagriti Awasthi: आयएएस जागृती अवस्थी यांनी कोरोनामध्ये ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करुन यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी २०२० मध्ये यूपीएससीत दुसरी रँक प्राप्त केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्ती महत्त्वाची असते. जर तुम्ही सतत प्रयत्न करत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. असंच यश जागृति अवस्थी यांनादेखील मिळालं. त्या यूपीएससी २०२० मध्ये दुसरी रँक मिळवून आयएएस झाल्या आहेत.

आयएएस जागृती अवस्थी (IAS Jagriti Awasthi) या मूळच्या मध्य प्रदेशच्या फतेहपूरच्या रहिवासी आहेत. त्यांनी कोरोनामध्ये लॉकडाउन असताना ऑनलाइन अभ्यास केला आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Success Story
Success Story: परदेशात शिक्षण, UPSC साठी भारतात परतल्या, दुसऱ्याच प्रयत्नात ९५ रँक; IAS सृष्टी मिश्रा यांचा प्रेणादायी प्रवास

जागृती यांनी भोपाळच्या आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इंजिनियरिंग केले. त्यानंतर त्यांना भारत हैवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये नोकरीदेखील मिळाली होती.परंतु जागृती यांचे पहिल्यापासूनच आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यांनी BHEL मधील नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

जागृति यांचे वडील डॉ. एससी अवस्थी प्रोफेसर आहेत. तर आई मधुमालती अवस्थी या शिक्षिका आहे. त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले अन् त्यांच्या आईने त्यांना पाठबळ दिले. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी आपली नोकरी सोडली आणि मुलीला काय हवं नको ते पाहिले. त्यांच्या घरात जागृति अभ्यास करत असताना साधा टीव्हीदेखील सुरु नसायचा.

जागृति अवस्थी यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली होती. यावेळी त्या प्रिलियम्सदेखील पास करु शकल्या नव्हत्या. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा संधी घेतली. २०२० मध्ये त्यांनी परीक्षा दिली आणि दुसरी रँक प्राप्त केली.

आयएएस जागृति यांचे मत आहे की, आयुष्यात कधीही शॉर्टकटमुळे यश मिळत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लाते. यूपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्ही नीट वाचा. त्यानुसार तुम्ही पुस्तके निवडा, असा सल्ला त्यांना सर्व विद्यार्थ्यांना दिला आहे.

Success Story
Success Story: परदेशात शिक्षण, UPSC साठी भारतात परतल्या, दुसऱ्याच प्रयत्नात ९५ रँक; IAS सृष्टी मिश्रा यांचा प्रेणादायी प्रवास

जागृति अवस्थी या ८ ते १० तास अभ्यास करायच्या. त्यांनी जो विषय त्यांना जास्त चांगला जमत नाही त्यावर लक्ष दिले. त्यांनी परीक्षेच्या आधी दोन महिने रोज १२ ते १४ तास अभ्यास केला. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

Success Story
Success Story: IIT मधून बीटेक, जर्मनीतील नोकरी सोडली, एकदा नाही तर दोनदा UPSC क्रॅक; IAS गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com