Kolhapur : केस ओढले, गळा आवळला, लाथाबुक्यांनी मारलं; घराच्या वाटणीवेळी तुंबळ हाणामारी|Video Viral

Women Assaulted in Family Fight : कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मालमत्तेच्या वादातून नातेवाईकांमध्येच मारामारी झाली. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Women Assaulted in Family Fight :
KOLHAPUR SHOCKER: FAMILY DISPUTE OVER PROPERTY TURNS VIOLENT, 5 BOOKEDsaam tv
Published On

घराची वाटणी चालू असतानाच वाद झाला. वाटणी करायला आलेल्या नातेवाईकांचीच एकमेकांमध्ये हाणामारी झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामधील गिजवणे गावातील एका घरात वाटणी चालू होती. त्याचदरम्यान नातेवाईकांमध्ये वाद झाला. ते एकमेकांना मारहाण करू लागले. या प्रकरणात ओमकार अमोल ढवळे, सरिता अमोल ढवळे, रेखा आप्पासाहेब पाटील, अमोल सुरेंद्र ढवळे आणि प्रभात शंकर साबळे या पाच जणांविरोधात गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादींच्या मुलगी आरती सागर पाटील यांना शिवीगाळ करत तिचे केस ओढून गळा आवळण्याचा तसेच लाथाबुक्यांनी मारहाण झाली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सुनिता महावीर शेरवी यांनाही मारहाण करत भिंतीवर डोके आपटल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे. या घटनेदरम्यान दगड आणि चप्पल फेकून मारहाण झाल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com