'साहेब इकडे या', एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याने मारली उद्धव ठाकरेंना हाक; पुढे काय घडलं? VIDEO

Bharat Gogawale Invites Uddhav Thackeray Video: मुंबईतील एका लग्न समारंभात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले समोरासमोर आले. ‘साहेब इकडे या’ अशी हाक देऊनही ठाकरे यांनी नकार दिला.

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त मुंबईमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये शिंदेगटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले आणि उद्धव ठाकरे हे वधू वरांना शुभेच्छा देण्यासाठी समोरासमोर आले. त्यावेळी भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांना साहेब इकडे या अशी हाक मारली. मात्र उद्धव ठाकरे यांनी 'नको नको मी इथेच बरा आहे, असे म्हणत गोगावले यांच्या जवळ जाणे साधले.

या प्रसंगाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भरत गोगावले यांनी या भेटीबाबत सांगताना म्हणाले, वधू वरां शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उभे होतो. तेव्हा उद्धव साहेब तिथे उभे होते. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, या आमच्या बाजूला उभे राहा. मात्र ते नको नको असे म्हणाले. त्यांना बोलावणे हे आमचे कर्तव्य होते. ते आम्ही केले. मात्र त्यांनी ते स्वीकारले नाही, त्यात आमचा काय दोष आहे, असे ही गोगावले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com