
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. आयुष्यात कितीही वेळा अपयश आले तरीही हार मानायची नसते. त्यातून आणखी चांगले कसं करता येईल, याकडे लक्ष द्यावे. अपयशावर मात करुन पुन्हा एकदा उभं राहायचं असतं. असंच काहीसं आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी केलं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असं समजून प्रयत्न केले. त्याचं यशदेखील त्यांना मिळालं.
आयएएस अवनrश शरण हे मूळचे बिहारचे आहेत. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण सरकारी शाळेतून केले. त्यानंतर त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचालदेखील केली.
१०वीत काठावर पास
अवनीश शरण यांनी दहावीत फक्त ४४.७ टक्के गुण होते. ते सुरुवातील अभ्यासात आजिबात हुशार नव्हते. त्यांना बारावीत ६५ टक्के गुण मिळाले. ग्रॅज्युएशनला ६० टक्के गुण प्राप्त केले.
अवनीश यांनी कंबाइंड डिफेंस सर्विसेस (CDS) औरसेंट्रल पुलिस फोर्सेस (CPF) परीक्षा दिली होती. या परीक्षादेखील यूपीएससीद्वारे घेतल्या जातात. परंतु त्यांना या परीक्षेत यश मिळाले नाही. ते राज्याच्या PCS प्रीलिम्समध्ये 10 वेळा अपयशी ठरले. परंतु यामुळे ते खचले नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न केले.
अवनीश हे यूपीएससीच्या (UPSC) पहिल्या प्रयत्नात पास झाले. परंतु इंटरव्ह्यूमध्ये अयशस्वी ठरले. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात ७७वी रँक प्राप्त केली. त्यांनी आपले आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या या यशाने कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे. तुम्हाला किती गुण मिळाले हे जास्त महत्त्वाचे नसते. त्यांनी अपयशावर कशी मात केली हे जास्त महत्त्वाचे असते. अपयश हे प्रत्येकालाच येते. परंतु त्यामुळे खचायचं नाही. आपण आपले प्रयत्न सुरु ठेवायचे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.