Success Story: 'ही कलेक्टर होणार...' आजोबांनी स्वप्न दाखवलं, नातीने पूर्ण केले, कोण आहेत आस्था सिंह?

Aastha Singh Youngest IAS Of India: आस्था सिंह यांनी यूपीएससी परीक्षेत ६१ रँक प्राप्त केली आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ही परीक्षा क्लिअर केली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

काही दिवसांपूर्वी यूपीएससी २०२४ चा निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले. या परीक्षेत पुन्हा एकदा मुली अव्वल ठरल्या आहेत. या परीक्षेत आस्था सिंहने ६१ रँक प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे आस्थाने वयाच्या फक्त २१ व्या वर्षी एवढ मोठं यश मिळवलं आहे. यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. पहिल्या प्रयत्नात तर खूप कमी जणांना यश मिळले. परंतु आस्थाने तिचे स्वप्न सत्यात उतरवले. ती देशातील सर्वात तरुण आयएएस ऑफिसरपैकी एक आहे. (Youngest IAS Officer Of India)

Success Story
Success Story: कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; २२व्या वर्षी IAS होणाऱ्या सुलोचना मीना आहेत तरी कोण?

२१ व्या वर्षी यूपीएससी क्रॅक (Aastha Singh Crack Upsc At 21 Age)

मिडिया रिपोर्टनुसार, आस्था सिंह ही मूळची पंजाबच्या पंचकुला येथील रहिवासी. त्यांचे वडील बृजेश सिंह एका फार्मा कंपनीत क्वालिटी हेड पदावर काम करतात. तर आई शालिनी सिंह पोस्ट ग्रॅज्युएट आहे. आपल्या लेकीने एवढ्या कमी वयात मिळवलेले हे यश पाहून त्यांच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला. आस्था यांच्या आजोबांचं स्वप्न होतं की त्या आयएएस व्हाव्यात. त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी वडिलांनी खूप सपोर्ट केले. त्याचंच फळ त्यांना मिळालं.

शिक्षण

आस्था सिंह यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकोनॉमिक्स ऑनर्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी यूपूएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी हरियाणामध्ये पीसीएस परीक्षादेखील दिली होती. त्यातदेखील त्या पास झाल्या होत्या. सध्या आस्था हरियाणा सरकारमध्ये अॅडिशनल एक्साइज अँड टॅक्सेशन ऑफिसर आहेत.

Success Story
Success Story: आईचा संघर्ष पाहून IAS होण्याच्या जिद्दीला पेटली, दिवसा काम अन् रात्री अभ्यास, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक

कोणत्याही कोचिंगशिवाय मिळवलं यश

आस्थानने यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी कोणतेही कोचिंग क्लास लावले नव्हते. त्यांनी सेल्फ स्टडी आणि टाइम मॅनेजमेंटमुळे हे यश मिळवलं आहे. इंटरनेवर अभ्यास, पुस्तके, प्रश्नपत्रिका हेच त्यांचे जग होते. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ६१ रँक प्राप्त केली.

Success Story
Success Story: आदिवासी ते IAS, अजय डोकेंनी जव्हारचे नाव महाराष्ट्रात केले, गावकऱ्यांनी डोक्यावर घेत काढली मिरवणूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com