Success Story: आदिवासी ते IAS, अजय डोकेंनी जव्हारचे नाव महाराष्ट्रात केले, गावकऱ्यांनी डोक्यावर घेत काढली मिरवणूक

Success Story of IAS Dr Ajay Kashinath Doke: पालघरच्या डॉ. अजय काशिनाथ डोके यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. एकदा दोनदा नव्हे तर सलग तिसऱ्यांदा त्यांनी ही परीक्षा पास केली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले. या परीक्षेत जव्हार तालुक्यातील आदिवासी मुलाने यश मिळवले आहे. त्याच्या गावात त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आपल्या गावातील मुलगा आयएएस झाला म्हणून सर्व गावकऱ्यांना खूप आनंद झाला.

Success Story
Success Story: जिद्द! रिक्षाचालकाच्या लेकीने दुसऱ्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; अदीबा अहमद ठरली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS

जव्हार तालुका म्हणजे कुपोषणाचा तालुका अशी ओळख आहे. मात्र ही ओळख आता गावातीलच तरुणांनी पुसून काढली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोगदे गावातील सुपुत्र डॉ. अजय काशीनाथ डोके यांने UPSC परीक्षा पास केली आहे. त्यांनी 364 रँक प्राप्त केली आहे. त्यांनी स्वतः ची IAS म्हणून नवीन ओळख निर्माण केली आहे.

कोकण विभागातून आदिवासी समाजाचे पहिलेच IAS अधिकारी झाले आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोगदे गावातील ग्रामस्थांनी डॉ. अजय काशीनाथ डोके यांच्या सह त्यांच्या आईवडिलांची वाजत गाजत मिरवणूक काढली. गावात रांगोळी काढत आदिवासी पारंपरिक नुसार सांबळी वाजवत मिरवणूक काढण्यात आली.

Success Story
Success Story: सिक्युरीटी गार्डच्या लेकीची भरारी! कोचिंग क्लासेसशिवाय UPSC क्रॅक ; अंकिता कांती यांचा खडतर प्रवास

डॉ अजय डोके यांनी कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता तीन वेळा upsc पास केली आहे. परंतु त्यांना IAS पद मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांच्या या यशामुळे आदिवासी कोगदा गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. याआधीही कोल्हारपूरच्या बीरदेव डोणे या मुलाने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. मेंढपाळाच्या मुलाने हे यश मिळवले आहे. त्यानंतर आता पालघरमधील डॉ. अजय काशीनाथ डोके यांनीदेखील नवा आदर्श निर्माण केला आहे.

Success Story
Success Story: वडील बस ड्रायव्हर, लेकीने क्रॅक केली UPSC; IAS प्रिती हुड्डा यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com