Success Story : रात्रीचं अंधत्व, डोक्याला टॉर्च लावून अभ्यास, शिवमचं दहावीत यश!

Pune News : पुण्यातील शिवम निफाडकरला अर्धअंधत्वाचा त्रास आहे. या स्थितीवर मात करत शिवमने दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. रात्रीच्या वेळेस नीट दिसत नसल्याने त्याने विशेष हेडटॉर्च लावून अभ्यास केला.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

संपूर्ण राज्यभरात काल (१३ मे रोजी) दहावी बोर्डाचा निकाल लागला. यंदा एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली. अनेक विद्यार्थ्यांनी ९९ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. अनेक विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी कालपासून समोर आली आहे. याच दरम्यान पुण्यातील एका विद्यार्थ्याच्या संघर्षाची कहाणी समोर आली आहे.

पुण्यातील नारायण पेठेत राहणाऱ्या शिवम उमेश निफाडकर या विद्यार्थ्याला अर्ध अंधत्व आहे. त्यामुळे तो फक्त सकाळीच अभ्यास करु शकतो. रात्री काहीच दिसू शकत नसल्याने त्याला रात्रीच्या वेळेस अभ्यास करता येत नाही. या अर्धअंधत्वावर मात करत एका विशेष हेडटॉर्चच्या मदतीने अभ्यास करुन शिवमने बोर्डाची परीक्षा दिली.

Success Story
Pune News : आता थांबायच नाय...! घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने क्रॅक केली SSCची परीक्षा

शिवमला रात्रीचं काहीच दिसत नाही, फक्त सूर्यप्रकाशात दिसतं. त्याच्या आरोग्याची गरज लक्षात घेऊन बोर्डाकडून विशेष सुविधा देण्यात आली होती. शिवमला हेडटॉर्च वापरुन परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली होती. दहावीच्या परीक्षा देण्यासाठी शिवमने प्रचंड मेहनत घेतली. तो बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. पुण्यातील नामांकित एस.पी. महाविद्यालयात प्रवेश घेण्याची शिवमची इच्छा आहे.

Success Story
जिद्दीला सलाम! रेल्वे स्थानकावर बेवारस सापडली, अनाथाश्रमात वाढली; दहावीत मिळवले ८९ टक्के

पुण्याच्या नारायण पेठेत राहणाऱ्या शिवम निफाडकरने अर्धअंधत्वावर मात करुन दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. अर्धअंधत्वाच्या स्थितीमुळे त्याला फक्त सकाळी दिसतं, यामुळे त्याने विशेष हेडटॉर्चचा वापर करुन अभ्यास केला. शिवमने बोर्डाच्या परीक्षेमध्ये ६७ टक्के मिळवले आहेत. त्याला एसपी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे.

Success Story
...माझं कुंकू परत आणलं, पहलगाम हल्ल्यानंतर चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या जवानाच्या पत्नीकडून नरेंद्र मोदींचं कौतुक, काय म्हणाली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com