...माझं कुंकू परत आणलं, पहलगाम हल्ल्यानंतर चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या जवानाच्या पत्नीकडून नरेंद्र मोदींचं कौतुक, काय म्हणाली?

BSF Jawan Wife Reaction : पहलगाम हल्ल्यानंतर चुकून पाकिस्तानमध्ये गेलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार श्रॉ आज भारतात सुखरुप परतले. यामुळे श्रॉ यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
BSF Jawan Wife Reaction
BSF Jawan Wife ReactionX
Published On

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी बीएसएफचे जवान पूर्णम कुमार शॉ चुकून सीमापार करुन पाकिस्तानमध्ये पोहोचले. पाकिस्तानी रेंजर्संनी त्यांना ताब्यात घेतले होते. २३ एप्रिलपासून ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. आज (१४ मे रोजी) त्यांना भारताकडे सुपूर्त करण्यात आले आहे. भारतात सुरक्षितपणे परतल्याने शॉ यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

पूर्णम कुमार शॉ यांची पत्नी रजनी शॉ यांनी 'नरेंद्र मोदी असतील, तर सर्वकाही शक्य आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला, तेव्हा त्यांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे १५-२० दिवसांत 'सुहाग'चा बदला घेतला. ४-५ दिवसांनी त्यांनी माझ्या पतीला, माझ्या कुंकवाला परत आणले, म्हणून मी हात जोडून त्यांचे मनापासून आभार मानू इच्छिते', असे वक्तव्य केले.

BSF Jawan Wife Reaction
जिद्दीला सलाम! रेल्वे स्थानकावर बेवारस सापडली, अनाथाश्रमात वाढली; दहावीत मिळवले ८९ टक्के

एएनआयशी संवाद साधताना रजनी शॉ म्हणाल्या, 'मला सकाळी एका अधिकाऱ्याचा फोन आला. माझ्या पतीनेही मला व्हिडीओ कॉल केला. ते शारीरिकदृष्टा निरोगी आहेत. काळजी करु नकोस असे त्यांनी मला सांगितले. मी ठीक आहे आणि ३ वाजता पुन्हा फोन करेन असेही ते म्हणाले, ३-४ दिवसांपूर्वी मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला होता. काळजी करु नकोस तुझा पती एका आठवड्यात परतेल असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. मला सर्वांचा पाठिंबा मिळाला. संपूर्ण देश माझ्यामागे उभा राहिला.'

BSF Jawan Wife Reaction
Kalyan News : खासगी शाळेतील संचालकाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; पालकांचा संताप, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

'मी सर्वांचे हात जोडून आभार मानते. तुम्हा सर्वांमुळेच माझे पती भारतात परतू शकते. मोदींमुळे सर्वकाही शक्य आहे. त्यांनी माझ्या पतीला परत आणले. म्हणून मी हात जोडून मनापासून आभार व्यक्त करु इच्छिते', असे रजनी शॉ म्हणाल्या. पाकिस्तानने बुधवार, १४ मे रोजी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना भारताच्या ताब्यात दिले. अटारी-वाघा बॉर्डरवर सकाळी साडेदहा वाजता पाकिस्तानच्या रेंजर्संनी त्यानी भारताकडे सुपूर्त केले.

BSF Jawan Wife Reaction
सामान घ्यायला घराबाहेर पडला, तो परतलाच नाही; लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com