Success Story: आईचा संघर्ष पाहून IAS होण्याच्या जिद्दीला पेटली, दिवसा काम अन् रात्री अभ्यास, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक

Success Story of IAS Shrusti Dabas: आयएएस सृष्टी डबास यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी रिझर्व्ह बँकेत नोकरी करत असताना हे यश मिळवलं आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण परीक्षेची तयारी करतात. परीक्षेची तयारी करताना दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. परंतु असेही काही आयएएस अधिकारी आहेत ज्यांनी नोकरी करत यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. यातील एक नाव म्हणजे आयएएस सृष्टी डबास. त्यांनी परीक्षेसोबतच यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Success Story
Success Story: अंध मुलासाठी आईच बनली दृष्टी; लेकाने केली UPSC क्रॅक; मायलेकाची यशोगाथा वाचून डोळे पाणावतील

सृष्टी डबास यांचे शिक्षण

सृष्टी डबास यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९८८ रोजी झाला. सृष्टी या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी दिल्लीतील गंगा इंटरनॅशनल स्कूलमधून अभ्यास केला. त्यांनी बारावीत ९६.३३ टक्के गुण मिळवली. यानंतर त्यांनी इंद्रप्रस्थ कॉलेजमधून पॉलिटिक्स सायन्समध्ये बीए पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी एमए केले.

सृष्टी डबास या अभ्यासात तर हुशार आहेत.त्याचसोबत त्या उत्तम कथ्थक डान्सर आहेत. त्यांनी आपल्या अभ्यासासोबत आपला छंददेखील जपला.

Success Story
Success Story: दोन सरकारी नोकऱ्या रिजेक्ट केल्या, २०१७ पासून तयारी, शेवटी बीरदेव IPS झाला!

आईचा संघर्ष

सृष्टी यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला नव्हता. त्यांचे आई वडील वेगवेगळे राहतात. तेव्हाच आईचे नाव मोठे करण्याचे सृष्टी यांनी ठरवले आणि करुनदेखील दाखवले. त्यांनी संपूर्ण जगाला आपली वेगळी ओळख निर्माण करुन दाखवली.

नोकरी करत असताना यूपीएससी परीक्षेची तयारी (Preparing For UPSC While Doing Job)

मिडिया रिपोर्टनुसार, सृष्टी डबास यांनी नोकरी करता करता यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी आरबीआय मुंबईमध्ये एचआर ब्रँड ग्रेड २ कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्या दिवसा नोकरी करायच्या आणि रात्री यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायच्या. त्यांना नोकरी करता करता अभ्यास करणे कठीण जात होते. परंतु त्यांनी हार मानली आहे.

लंच ब्रेकमध्येही केला अभ्यास (Studied At Lunch Break)

आयएएस सृष्टी डबास यांना जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा त्या आरबीआयच्या लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करायच्या. लंच ब्रेकमध्ये त्या रिविजन करायच्या. रिझर्व्ह बँकेत काम करण्याआधी त्यांनी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड Empowerment मध्ये काम केले. त्यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यशदेखील मिळवले.

Success Story
Success Story: PHD चे शिक्षण अर्धवट सोडले, स्वतः चे स्वप्न बाजूला ठेवून झाली सैन्यात भरती; कर्नल सोफिया कुरेशी यांचा प्रेरणादायी प्रवास

सृ्ष्टी यांनी मिळाली सहावी रँक

सृष्टी डबास यांनी आपल्या मेहनतीने हे यश मिळवले आहे. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) पास पास केली आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांना सहावी रँक मिळाली आहे. त्या २०२४ च्या बॅचच्या आयएएस ऑफिसर आहेत.

Success Story
Success Story: सिक्युरीटी गार्डच्या लेकीची भरारी! कोचिंग क्लासेसशिवाय UPSC क्रॅक ; अंकिता कांती यांचा खडतर प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com