शिंदेसेनेसोबत जाण्यास हरकत काय? ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान, राज्याच्या राजकारणात भूकंप

Ambadas Danve Statement On Shinde Sena Alliance: ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेसेनेसोबत जाण्याबाबत मोठं विधान केलं. राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. मात्र त्या अगोदरच या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आम्ही देखील सत्तेत सहभागी होऊ शकतो, शिंदेसेनेसोबत जाण्यास हरकत काय? आम्ही संत महंत नाहीत राजकारणी आहोत. राजकारण आम्हालाही साधावे लागेल, दोघांचे भांडण झाल्यास आम्हाला संधी आहे.असे मोठे विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे. दानवे म्हणाले, आमचे नगरसेवक सहलीवर गेले हे सत्य आहे.

शिंदेसेनेचे गेलेत की नाही माहिती नाही. पण उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीला 24 तास अजून वेळ आहे. त्यामुळे राजकारणात 24 तासात काहीही होऊ शकतं. ते दोघ भांडत राहिले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. ते भांडले की आमचा फायदा आहे. असे अंबादास दानवे म्हणाले. त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय राजकीय घडामोडी घडता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com