Accident: दिल्ली-मुंबई हायवेवर STF ची गाडी उलटली, २ जवानांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

STF accident Delhi Mumbai highway : दिल्ली-मुंबई महामार्गावर रतलामजवळ बिहार एसटीएफची गाडी उलटली. या अपघातात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला इंदूरला हलवण्यात आले आहे.
Accident
AccidentAccident
Published On

बिहारमधून गुजरातला निघालेल्या एसटीए (STF -विशेष कृती दल) ची गाडी मध्य प्रदेशमध्ये दिल्ली-मुंबई हायवेवर उलटली. या दुर्दैवी अपघातामध्ये दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. एका जवानाची प्रकृती अतिशय गंभीर आहे, त्याला पुढील उपचारासाठी इंदूरला हलवण्यात आले आहे. इतर जखमींवर रतलाम मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये मुकुंद मुरारी विकास कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष कुमार, जिवधारी कुमर, मिथिलेस पासवाल आणि रंजन कुमार जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिहार STF चे जवान गुजरातमध्ये एका विशेष मोहिमेसाठी निघाले होते. त्यावेळीच दिल्ली-मुंबई हायवेवर लेन नंबर ८ वर काळाने घाला घातला अन् गाडीचा अपघात झाला. दोन जणांचा जागीच मृत्य झाला. अपघाताची माहिती मिळताच रतलामचे एसपी अमित कुमार, एएसपी राकेश यांच्यासह पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या अपघाताची कारणे शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Accident
Nashik : मविआ गेली खड्ड्यात, राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यावर काळं फासणार, ठाकरेंचा शिलेदार आक्रमक

अपघातामध्ये मृत्यू झालेल्या जवानांचे मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तर जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्यामध्ये इंदूर येथे हलवण्यात आले आहे. पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास तीव्र केला आहे. मृत जवानांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Accident
Shocking News : हार्ट अटॅकला Acidity समजलं, १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

रतलामचे एसपी अमित कुमार यांनी सांगितले की, बिहार एसटीएफचे जवान गुजरातमध्ये धाड टाकण्यासाठी जात होते. सर्व जवान बिहारमधील गया येथून स्कॉर्पियो गाडीने गांधीधामला जात होते. पण मध्येच रतलामजवळ दिल्ली मुंबई हायवेवर लेन क्रमांक ८ वर अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे संतुलन बिघडल्यामुळे गाडी उलटली. जखमीने सांगितले की, अपघातानंतर गाडी १०० मीटरपर्यंत घसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com