Nashik : मविआ गेली खड्ड्यात, राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यावर काळं फासणार, ठाकरेंचा शिलेदार आक्रमक

Rahul Gandhi News : सावरकरांवरील वक्तव्यावरून नाशिकमध्ये राहुल गांधींना काळं फासणार असल्याचा इशारा बाळा दराडे यांनी दिला आहे. महाविकास आघाडीतील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi Saam tv
Published On

Rahul Gandhi Nashik visit threat : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उप महानगर प्रमुख बाळा दराडे यांनी थेट काँग्रेस नेते राहुल यांना इशारा दिला आहे. राहुल गांधी नाशिकला आले तर काळं फासणार असल्याचा इशारा दराडेंनी दिलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वक्तव्यामुळे राहुल गांधी अडचणीत आले आहेत, याप्रकरणी त्यांना नाशिक कोर्टात हजर राहावे लागणार आहे.त्याआधी ठाकरेंच्या शिलेदाराने हा इशारा दिला आहे. सावरकर आणि हिंदुत्व हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर काळे फासणार आहे, असा इशारा दराडेंनी दिला आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळं फासून गाडीवर दगडफेक करू, अशा इसारा बाळा दराडे यांनी दिलाय. सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही. महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, सावरकर आणि हिंदुत्व आधी आहे, असे ठाकरेंचे नाशिकमधील शिलेदार दराडे म्हणाले. पुढील काही दिवसांत राहुल गांधी सुनावणीसाठी नाशिक कोर्टात हजर राहणार आहे, त्याआधी दराडे यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील तणाव तीव्र होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi News
Nashik : ठाकरेंना मोठा हादरा! नाशिकमध्ये शिवसेनेला खिंडार, विश्वासू माजी आमदाराने साथ सोडली

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना ठाकरेंचे नेते बाळा दराडे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला. राहुल गांधी यांनी दोनवेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. सावरकरांना माफीवीर म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गंधी यांच्यावर जहरी टीका केली होती. आता आता नाशिकमधील वकील मनोज पिंगळे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. राहुल गांधी यांना कोर्टाकडून समन्स बजाबला आहे. सुनावणीसाठी राहुल गांधी कोर्टात आले तर ठाकरे शैलीत उत्तर दिले जाणार असा इशारा बाळा दराडे यांनी दिला.

Rahul Gandhi News
Local Body Elections : भाजपचं एकला चलो, मुंबई, ठाणे, पुण्यात चाचपणी, अमित शाह यांचे मोठे संकेत

राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर ठाकरे शैलीत उत्तर दिले जाईल. त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू, तोंडाला काळं फासू, असा इशारा दराडे यांनी राहुल गांधींना दिला. महाविकास आघाडी नंतर, मविआ गेली खड्ड्यात, आधी सावरकर आणि हिंदुत्व. सावकर यांच्याबद्दल केलेलं कोणतंही वक्तव्य खपवून घेणाप नाही, असंही दराडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com