Nashik : ठाकरेंना मोठा हादरा! नाशिकमध्ये शिवसेनेला खिंडार, विश्वासू माजी आमदाराने साथ सोडली

Nashik municipal elections : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का, माजी आमदार निर्मला गावित यांचा शिंदे गटात प्रवेश, स्थानिक राजकारणात मोठा बदल.
Maharashtra Politics: ठाकरेंना धक्क्यावर धक्के
eknath shinde news Saam tv
Published On

Maharashtra Politics News : नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. माजी आमदार निर्मला गावित यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला आहे. गावित एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजतेय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना नाशिकमध्ये गावित यांच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. गावित यांचे नाशिकच्या राजकारणात मोठं वजन आहे, त्यामुळे आता ठाकरे काय रणनिती करणार? याकडे शिवसैनिकांच्या नजरा खिळल्या आहे.

नाशिक महानगरपालिका निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाची मानली जातेय. त्याआधीच गावित यांच्यासारखा विश्वासू चेहऱ्याने साथ सोडली, त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. निर्मला गावित आज एखनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याशिवाय ⁠इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमधी ५ सभापती , १ जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्यासह अनेक माजी सरपंच आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यामध्ये आज गावित आणि इतरांचा पक्ष प्रवेश होणार आहे. ⁠उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ठाण्यामध्ये पक्ष प्रवेश सोहळा होत आहे.

Maharashtra Politics: ठाकरेंना धक्क्यावर धक्के
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : हगवणे भावांचे पाय खोलात, आता नवी चौकशी होणार

निर्मला गावित या इगतपुरी मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार झाल्या होत्या. नंतर हिरामण खोसकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर होत्या, मात्र तिकीट मिळणार नव्हते म्हणून माघार घेतली. पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या पण ती जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांना निवडणूक लढवता आली नाही. गावित या काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती, पण त्या आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

Maharashtra Politics: ठाकरेंना धक्क्यावर धक्के
Pune Shivsena: पुण्यात ठाकरे गटाला खिंडार, आणखी एका शिलेदाराने साथ सोडली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com