महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

rajasthan accident : राजस्थानमध्ये महामार्गावर भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना बस आणि ट्रकच्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.
rajasthan news
rajasthan accident Saam tv
Published On
Summary

राजस्थानच्या हनुमानगढमध्ये भीषण अपघात झाला

बस-ट्रक धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला

अपघातात १२ हून अधिक प्रवासी जखमी

राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. श्रीगंगापूरहून जयपूरकडे जाणाऱ्या बसने ट्रकला धडक दिली. या अपघातात ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १२ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्यावर एक वाहतूक कोंडी झाली.

बस चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु समोर येणाऱ्या ट्रकला बस धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, बसचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झालाय.

अपघातानंतर रस्त्यावर एकच आरडाओरड झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. सूचना माहिती मिळताच पोलीस टीम आणि रुग्णवाहिका देखील पोहोचली. पोलिसांनी जखमींना तातडीने रावतसर रुग्णालयात दाखल केले.

rajasthan news
युद्ध भडकलं! जगातील आणखी एका पॉवरफुल नेत्याची हत्या केल्याचा दावा

रावतसरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आढावा घेतला. पोलीस अधिकारी संजय अग्रवाल यांनी म्हटलं आहे की, रुग्णालयात नेण्याआधीच ५ जणांचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाला. तर ७ जखमी लोकांवर उपचार सुरू आहेत. यातील ३-४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यांना पुढील उपचारासाठी हनुमानगढ जिल्ह्यात दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

rajasthan news
भाजपने डाव टाकला, ममता बॅनर्जी चक्रव्यूहात अडकल्या? नेमकं काय घडलं?

पोलिसांनी ५ जणांचे मृतदेह शवगृहात पाठवले आहेत. रुग्णालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी दूर करून वाहतूक सुरळीत केली. नेमका अपघात कसा झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. ५ प्रवाशांच्या निधनानंतर हनुमानगढ जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com