युद्ध भडकलं! जगातील आणखी एका पॉवरफुल नेत्याची हत्या केल्याचा दावा

Ali Larijani news :इस्त्रायल आणि इराणमधील युद्ध आणखी भडकलं आहे. आता इराणच्या आणखी एका पॉवरफुल नेत्याची हत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे.
Ali Larijani
Ali Larijani news :Saam tv
Published On
Summary

इराणच्या अली लारिजानी यांच्या हत्येचा दावा

इस्त्रायलने केलेला दावा इराणने फेटाळला

पश्चिम आशियात तणाव आणखी वाढण्याची शक्यता

इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इस्त्रायलने तेहरानचे दुसरे पॉवरफुल नेते अली लारिजानी यांना लक्ष्य केलं आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्र्‍यांनी तेहरानचे दुसरे पॉवरफुल नेते अली लारिजानी यांची हत्या केल्याचा दावा केला आहे. अल जजीराच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री इस्त्रायल काट्ज यांनी लारिजानी यांच्या मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. परंतु इराणने त्यांचा दावा फेटाळून लावला आहे.

Ali Larijani
Turkey Referee Punched: फुटबॉलचं मैदान की WWFचं; लाइव्ह मॅचमध्ये संघ मालकाचा रेफ्रीला जोरदार 'पंच'

लारिजानी यांच्या कार्यालयातून जाहीर करण्यात आलं आहे की, इराण पत्रकार परिषद घेऊन महत्वाचा संदेश देईल. याआधी इस्त्रायलच्या माध्यमांनी सूत्रांच्या मदतीने एक अहवाल जाहीर केला होता, त्यात सोमवारी रात्री लारिजानी यांच्या निवासस्थानी, कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याची माहिती होती'.

रिपोर्टच्या माहितीनुसार, लारिजानी यांचा मृत्यू झाला आहे की नाही, याबाबत इस्त्रायल शोध घेत आहे. खामेनेई यांच्या हत्येनंतर लारिजानी हे सैन्य दलाला कमांड देत होते'.

टाइम्स ऑफ इस्त्रायलच्या माहितीनुसार, इस्त्रायलने युद्धाच्या तिसऱ्या आठवड्यात लारिजानी यांना टार्गेट केलं आहे. लारिजानी यांच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु इस्त्रायलला लारिजानी यांच्याविषयी अधिक माहिती मिळालेली नाही' .दुसरीकडे इस्त्रायलच्या सुरक्षा दलाने दावा केला आहे की, त्यांनी बासिज दलाचे प्रमुख गुलाम रजा सुलेमानी यांना संपवलं आहे. बासिस दल हे इस्त्रायलच्या संरक्षण दलाचे सर्वात मोठे निम शासकीय संघटन आहे.

Ali Larijani
गॅस सिलिंडर ते LPG कनेक्शन; सरकारने घेतला मोठा निर्णय, वाचा नेमकं काय काय बदललं?

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराणचे नवीन सर्वोच्च नेते सध्या जखमी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे इराणविषयक सर्व प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी लारिजानी यांच्यावर होती. लारिजानी हे इराणचे अयातुल्ली अली खामेनेई यांच्या जवळचे मानले जात होते. खामेनेई यांनी जून २०२५ साली सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून लारिजानी यांची नियुक्ती करण्यात आली होती. दुसरीकडे अमेरिकेने सेंटकॉम कमांडने लारिजानी यांना त्यांच्या हिट लिस्टमध्ये टाकले होते. तसेच लारिजांनी यांना पकडण्यास मदत करणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com