

सरकारकडून एलपीजीऐवजी पीएनजी वापरण्याचे आवाहन
एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे घेतला निर्णय
पीएनजी कनेक्शनवर ३१ मार्चपर्यंत विशेष सवलत मिळणार
LPG to PNG Shift: सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्यांना मोठं आवाहन केलं आहे. एलपीजी गॅस वापरणाऱ्यांना पीएनजी कनेक्शन वापरण्याचे आवाहन केलं आहे. एलपीजी गॅस कनेक्शनचा तुटवडा जाणवू लागल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून पीएनजी कनेक्शन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सरकारने ३१ मार्चपर्यंत एलपीजी गॅस सोडून पीएनजी कनेक्शन घेणाऱ्यांना सूट देखील जाहीर करण्यात आली आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या जॉइंट सेक्रेटरी सुजाता शर्मा यांनी सांगितलं की, मागील काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू आहे. देशास सर्वत्र इंधनाचा पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. काही भागात पाइप नॅचरल गॅसचे केंद्र आधीपासून आहे. त्यामुळे आता एलपीजी गॅस असणाऱ्यांनी पीएनजी कनेक्शन घेण्याचा विचार करायला हवा'.
सरकार देखील गॅस डिस्ट्रब्यूशन कंपन्यांच्या मदतीने पीएनजी वापरण्यास प्रोत्साहन देत आहे. तसेच कंपनीने नव्याने ग्राहक जोडण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रोत्साहनपर लाभ देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएनजी कनेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी काही कंपन्यांनी विशेष सुट देखील जाहीर केली आहे. मसलन, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने ३१ मार्च आधी पीएनजी कनेक्शन घेणाऱ्यांना ५०० रुपयांचा मोफत गॅस देणार असल्याची घोषणा केली आहे'.
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, पीएनजी कनेक्शनला प्रोत्साहन दिल्याने एलपीजी सिलिंडरमुळे येणारा ताण कमी होईल. त्यामुळे इंधन पुरवठा सुरळीत होईल'. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ज्या भागात पीएनजी कनेक्शनची सोय आहे. त्या भागातील एलपीजी गॅस कनेक्शन असणाऱ्यांनी पीएनजी कनेक्शनकडे वळावे. यामुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावरील ताण कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.