

नगर जिल्ह्यातील जामखेड येथे घडली होती गोळीबाराची घटना
कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर केला होता हल्लेखोरांनी गोळीबार
गंभीर जखमी झालेल्या गुंड मोहळकरचा उपचारादरम्यान मृत्यू
सुशील थोरात, साम टीव्ही
अहिल्यानगरच्या जामखेडमधील कुख्यात गुंड मोहळकर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. नगरच्या जामखेडमधील गोळीबार प्रकरणातील गंभीर जखमी कुख्यात गुंड सागर मोहळकरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गुंड निलेश घायवळला कानफटात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर ४ मार्च रोजी रात्री जामखेडच्या नुराणी कॉलनी परिसरात गोळीबार झाला होता. सागर मोहळकर याच्यावर आरोपी अभिमन्यू पोते याने ७ राऊंड फायर केले होते.
७ गोळ्यांपैकी काही गोळ्या गुंड मोहळकर याच्या शरीरात घुसल्या होत्या. त्यानंतर त्याला जामखेडमधील एका रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर ससून रुग्णालयात १२ दिवसांपासून उपचार सुरू होते. त्याचा आज सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर आरोपी पोते याने गोळीबार केला होता. यात भीषण हल्ल्यात मोहळकरला ४ गोळ्या लागल्या होत्या. प्राथमिक उपचारानंतर नगरहून त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रुग्णालयात दाखल केलेल्या गुंड सागरची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती.
सागर मोहळकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुंड सागर हा महिनाभरापूर्वीच जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्या सुटकेनंतर शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात होती. काही महिन्यांपूर्वी एका कुस्ती सामन्यादरम्यान त्याने गुंड निलेश गायवळ याच्या कानफटात लावली होती. त्यानंतर गुंड सागर चांगलाच चर्चेत आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.