UPI Payment  Saam Tv
बिझनेस

UPI Payment: इंटरनेटशिवाय UPI पेमेंट कसं करायचं? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

UPI Payment Without Internet: आजकाल सर्वजण यूपीआयद्वारे पेमेंट करतात. आता तुम्ही इंटरनेटशिवायदेखील यूपीआय पेमेंट करु शकणार आहात. त्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा.

Siddhi Hande

सध्या डिजिटल पेमेंटचे प्रमाण खूप वाढत आहे. अगदी भाजी घेण्यापासून ते जेवणापर्यंत सर्वांचे बिल आपण ऑनलाइन पद्धतीने भरतो. यूपीआयचा वापर करुन व्यव्हार करणे खूप सोपे झाले आहे. यूपीआयचा वापर हा आपण इंटरनेटद्वारे करतो. परंतु कधीकधी आपल्या फोनचे नेट बंद होते अशा परिस्थितीत तुम्ही इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट करु शकतात. (UPI Payment)

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन सेवा सुरु केली आहे. ज्यात तुम्ही इंटरनेशिवाय यूपीआय पेमेंट करु शकतात.युजर्स USSD कोड *99# डायल करुन ऑफलाइन बँकिंगचा लाभ घेऊ शकतात.

या सुविधेमुळे तुम्ही इंटरबँक फंड ट्रान्सफर, बॅलेन्स चेक करणे, यूपीआय पिन सेट करणे ही काम करु शकतात. यामुळे तुम्ही आता इंटरनेट नसतानाही पैसे पाठवू शकणार आहे. यामुळे जर तुम्हाला कधी इंटरनेट कनेक्शन मिळत नसेल तर काळजी करु नका. यूपीआयच्या या नवीन सेवेचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे.

इंटरनेटशिवाय पेमेंट कसं करायचं? (How to do UPI Payment Without Internet)

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन *99# डायल करा.

यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.

यानंतर बँकिंग सेवा निवडा. यात पैसे पाठवणे, बॅलेंस चेक करणे याचा समावेश होतो.

यानंतर पैसे पाठवण्यात १ टाइप करा असे सांगितले जाईल. त्यानंतर ते बटण दाबा.

पैसे पाठवण्याची पद्धत निवडा. मोबाईल, यूपीआय आयडी किंवा सेव्ह केलेला नंबर असे पर्याय निवडा.

यानंतर तुम्हाला पेमेंटची रक्कम टाकावी लागेल. त्यानंतर तुमचा यूपीआय पिन टाकावा लागेल.

तुम्ही इंटरनेटशिवाय पेमेंट करु शकणार आहे. पेमेंट करताना नेहमी समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर, यूपीआय आयडी चेक करा त्यानंतरच पेमेंट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT