UPI च्या एका अकाउंटवरुन करु शकणार ५ लोक पेमेंट; काय आहे यूपीआय सर्कल?

UPI Circle Feature: यूपीआय युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. यूपीआय युजर्सच्या एका अकाउंटवरुन ५ लोक पेमेंट करु शकणार आहेत. हे फीचर लवकरच लाँच होणार आहे.
UPI
UPI Saam Tv
Published On

सध्या सर्वजण ऑनलाइन पेमेंटचा वापर करतात. यूपीआय पेमेंटमुळे सर्वजण सोप्या पद्धतीने पेमेंट करतात. यूपीएआयमुळे अनेक कामे सोपी झाली आहे. याच यूपीआय पेमेंटने नवे फिचर लाँच केले आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी UPI पेमेंटमध्ये नवीन फिचर देण्यात आले आहे.NPCI (National Payment Corporation Of India )ने युपीआय सर्कल सुरु केले आहे.

UPI
Atal Pension Scheme: रोज ७ रुपये गुंतवा अन् आयुष्यभर ६०,००० रुपयांची पेन्शन मिळवा;काय आहे अटल पेन्शन योजना?

यूपीआय सर्कलमुळे (UPI Circle) युजर्संना पेमेंट करणे सोपे होणार आहे.आता तुमच्या कुटुंबातील ५ लोक यूपीआय सर्कलच्या मदतीने एकाच अकाउंटवरुन पेमेंट करु शकणार आहेत. तुमच्या कुटुंबातील सदस्य UPI शी कनेक्ट होऊ शकतात. तुम्ही तुमचा प्रायमरी यूपीआय कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत शेअर करु शकतात.

या फिचरमुळे प्राथमिक खातेधारक म्हणजे ज्यांच्या नावावर अकाउंट आहे तो व्यक्ती इतर युजर्सवर नियंत्रण ठेवू शकतात. या फीचरमध्ये दोन प्रकारचे डेलीगेशन देण्यात आले आहेत. फुल आणि पार्शियल असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. Full Delegation म्हणजे सेकंडरी युजर्सला काही लिमिटपर्यंत पैसे काढण्यासाठी प्राथमिक खातेधारकाच्या परवानगीची गरज नाही.तर Partial Delegation मध्ये सेकंडरी युजर्सला पेमेंट रिक्वेस्ट पाठवावी लागेल. प्रायमरी खातेधारकांनी तुमची रिक्वेस्ट मान्य केली तरच तुम्ही व्यव्हार करु शकतात. या व्यव्हारासाठी तु्म्हाला यूपीआय पीन (UPI PIN)ची गरज आहे.

UPI
Kisan Vikas Patra Scheme: ५ लाख रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काय आहे किसान विकास पत्र योजना?

NPCI नुसार, युजर्स नेहमी आपल्या आवडीच्या यूपीआय अॅपवरुन व्यव्हार करतात. हेच अॅप आणि अकाउंट वापरुन सेकंडरी युजर्सदेखील व्यव्हार करु शकणार आहेत. यासाठी त्यांना बायोमॅट्रिक किंवा पासवर्डचा वापर करावा लागेल. Full Delegation मधील प्रत्येक व्यक्ती १५ हजार रुपये प्रत्येक महिन्याला व्यव्हार करु शकतात. तर Partial Delegation मध्ये युजर्स फक्त ५ हजार रुपयांपर्यंत व्यव्हार करु शकतात.

UPI Circle फीचर कसे वापरायचे?

UPI Circle फीचरचा वापर करण्यासाठी सेकंडरी युजर्संना सर्वप्रथम क्यू आर कोड स्कॅन करुन मग यूपीआय आयडी सुरु करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सेकंडरी युजर्संना कोणते कंट्रोल द्यायचे आहे, असे विचारण्यात येईल. त्यानंतरच सेकंडरी युजर्स हे फीचर वापरु शकतात. सध्या हे फीचर उपलब्ध नाही आहे परंतु लवकरच हे फीचर ग्राहकांसाठी लाँच करण्यात येईल.

UPI
Government Scheme For Farmers : खुशखबर! शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात मिळणार तब्बल 2 कोटी रुपयांपर्यंचे कर्ज; काय आहे केंद्र सरकारची नवी योजना? जाणून घ्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com