जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपमुळे कोणतीही माहिती एका क्लिकवर आपल्याला मिळते. व्हॉट्सअॅप नेहमीच युजर्ससाठी वेगवेगळे फीचर्स लाँच करत असतात. व्बॉट्सअॅपने नुकतेच ग्रुप डिस्क्रिप्शन कम्युनिटीज फीचर लाँच केले आहे. या फिचरमुळे युजर्संना ग्रुप जॉइन करण्याआधीच ग्रुपची माहिती मिळते.
WaBetainfo ने याबाबत माहिती दिली आहे. कम्युनिटीजसाठी ग्रुप डिस्क्रिप्शन फीचर लाँच करण्यात आले आहे. हे नवीन फीचर WhatsApp For Ios व्हर्जन २४.१६.७२ मध्ये मिळणार आहे. यामध्ये गॅुपचे डिस्क्रिप्शन आधीच पाहता येणार आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये अनेकदा युजर्संना न विचारता त्यांना ग्रुपमध्ये अॅड केले जाते किंवा त्यांना इनवाइट केले जाते. परंतु हा ग्रुप बनवण्याचे कारण आणि याचा फायदा काय होणार, याबाबत माहिती नसते. त्यामुळेच हे नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरमध्ये युजर्संना एखाद्या ग्रुपमध्ये अॅड होण्याआधीच त्याची संपूर्ण माहिती मिळते. यामुळे त्यांना ग्रुपच्या सदस्यांची किंवा ग्रुप का बनवला याबाबत माहिती मिळणार आहे.
सध्या हे नवीन फीचर फक्त iOS अॅपमध्ये आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे फीचर सर्व अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये लाँच करण्यात येणार आहे.
प्रोफाइलमध्ये अॅनिमेटेड अवतार
याचसोबत व्हॉट्सअॅप अजून एका फीचरवर काम करत आहे. ज्यामध्ये युजर्सचे अॅनिमेटेड अवतार प्रोफाइन स्क्रिनवर दिसणार आहे. हे अवतार युजर्स आपल्याला हवे तसे तयार करु शकतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.