WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी!आता 'या' स्मार्टफोनमध्ये होणार WhatsApp बंद; तुमचा फोन आहे का यात?लगेच चेक करा

Whatsapp Will Not Working In These Smartphones: व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता काही स्मार्टफोन व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. यात तुमचा स्मार्टफोन नाही ना? लगेच चेक करा.
Whatsapp Will Not Working In These Smartphones
Whatsapp Will Not Working In These SmartphonesSaam Tv
Published On

सध्या जगभरातील लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपमुळे सर्वकाही सोपे झाले आहे. परदेशातील व्यक्तींशीही आपण संपर्क साधू शकतो. व्हॉट्सअॅप जर बंद झाले तर हा विचारदेखील आपण करु शकत नाही. परंतु आता काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये अनेक नवीन अपडेट आले आहेत. हे नवीन व्हर्जन काही स्मार्टफोनमध्ये सपोर्ट करत नाही. त्यामुळे काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार नाही.

व्हॉट्सअॅप कंपनी नेहमीच युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन नवीन फीचर लाँच करत असते. युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊनच आता कंपनीने काही स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युजर्सने त्यांच्याकडे यापैकी कोणता स्मार्टफोन नाही ना हे तपासून घ्यावे.

Whatsapp Will Not Working In These Smartphones
Whatsapp: आता तुमचे मेसेज राहणार अधिक सेफ आणि गोपनीय, Whatsapp ने सुरू केली राष्ट्रीय सुरक्षा मोहीम

Android आणि iOS चे अनेक नवीन व्हर्जन अपडेट झाले आहेत. परंतु अजूनही काही युजर्स जुन्या अँड्रॉइड व्हर्जनचा वापर करत आहे. व्हॉट्सअॅपने Andoid 4 आणि iOS 11 व्हर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोनवरुन सपोर्ट काढला आहे. व्हॉट्सअॅप सध्या Andoid 5 आणि iOS 11 व्हर्जनला सपोर्ट करते. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनचे व्हर्जन कोणते आहे ते चेक करा.

मिडिया रिपोर्टनुसार, ३५ स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप आपली सुविधा बंद करणार आहे. यामध्ये अॅपल, सॅमसंग, मोटोरोला या कंपनीच्या स्मार्टफोनचा समावेश आहे.

Whatsapp Will Not Working In These Smartphones
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

सॅमसंगच्या या स्मार्टफोन व्हॉट्सअॅप होणार बंद

Samsung Galaxy Ace Plus,Samsung Galaxy Core, Samsung Galaxy Express 2,Samsung Galaxy Grand,Samsung Galaxy Note 3 N9005 LTE,Samsung Galaxy Note 3 Neo LTE+,Samsung Galaxy S 19500, Samsung Galaxy S3 Mini VE, Samsung Galaxy S4 Active,Samsung Galaxy S4 mini 19190,Samsung Galaxy S4 mini 19192 Duos,Samsung Galaxy S4 mini 19195 LTE,Samsung Galaxy S4 Zoom या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप आपली सेवा बंद करणार आहे.

अॅपलच्या या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद

Apple iPhone 5,Apple iPhone 6,Apple iPhone 6S Plus,Apple iPhone 6S,Apple iPhone SE या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे.

Whatsapp Will Not Working In These Smartphones
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! दोन वर्षात महिला होणार लखपती; कसं?जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com