Whatsapp: आता तुमचे मेसेज राहणार अधिक सेफ आणि गोपनीय, Whatsapp ने सुरू केली राष्ट्रीय सुरक्षा मोहीम

Whatsapp Security Features: जगभरात अनेक लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपचा वापर करुन आपण कोणत्याही देशातील व्यक्तीशी संवाद साधू शकतो. व्हॉट्सअॅपचा वापर करुन तुमच्यासोबत काही फ्रॉड होऊ नये, यासाठी कंपनी नेहमीच नवनवीन फीचर लाँच करत असते.
Whatsapp Features
Whatsapp FeaturesSaam Tv
Published On

सध्या जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपवरुन तुम्ही कोणतीही माहिती एकमेकांना पाठवू शकतात. अगदी दुसऱ्या देशातील एखाद्या व्यक्तीशी तुम्ही संवाद साधू शकतात. व्हॉट्सअॅप नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन फीचर लाँच करत असते. या फीचर्समुळे युजर्संची सुरक्षितता आणि गोपनियतेत वाढ होते. त्यामुळेच व्हॉट्सअॅपने आता गोपनीयता मोहिम लाँच केली आहे. या मोहिमेतून युजर्संच्या संवादावर नियंत्रण आणि गोपनियता ठेवण्यात येईल. ही मोहिम महाराष्ट्रासह ७ राज्यात राबवण्यात येईल.

Whatsapp Features
Whatsapp भारतात होणार बंद? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली महत्त्वाची माहिती

या मोहिमेमुळे जर कोणती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दूर राहण्या व्यक्तीशी संवाद साधत असेल तर तिच्या सुरक्षेची काळजी घेतली असते. यामधून वर्षानुवर्षे भर करण्‍यात आलेल्‍या गोपनीयता व सुरक्षितता वैशिष्‍ट्यांच्‍या बिल्‍ट-इन स्‍तरांच्‍या माध्‍यमातून युजर-प्रायव्‍हसीप्रती व्‍हॉट्सअॅपची कटिबद्धता दिसून येते.

एण्‍ड-टू-एण्‍ड एन्क्रिप्‍शन व्‍हॉट्सअॅपवर कॉल्‍स व मेसेजेस् सुरक्षित ठेवण्‍यासह ही जाहिरात वापरकर्त्‍यांना ब्‍लॉक अँड रिपोर्ट, टू-स्‍टेप व्‍हेरिफिकेशन आणि मेटा व्‍हेरिफाईड यासारख्‍या गोपनीयता वैशिष्‍ट्यांची माहिती देते, जे संवादांची सुरक्षितता प्रबळ करण्‍यास मदत करतात. व्‍यवसाय प्रोफाइलवरील सत्‍यापित बॅज ग्राहकांना व्‍हॉट्सअॅपवर विश्‍वसनीय व्‍यवसाय ओळखण्‍यास मदत करतो, तसेच तो योग्‍य व्‍यवसायासोबत चॅटिंग करत असल्‍याची खात्री देतो.

या मोहिमेचा भाग म्‍हणून व्‍हॉट्सअॅप वापरकर्त्‍यांमध्‍ये सुरक्षितता साधने व वैशिष्‍ट्यांबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी समर्पित उत्‍पादन जाहिरातींची सिरीज देखील रीलीज करत आहे. ही सुरक्षितता साधने व वैशिष्‍ट्ये व्‍यक्‍तींना ऑनलाइन घोटाळे व फसवणूकांपासून सुरक्षित राहण्‍यास मदत करण्‍यासाठी आवश्‍यक सुरक्षितता देतात.

Whatsapp Features
Whatsapp Feature: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर घालणार धुमाकूळ; स्टेटस होणार आणखी मजेशीर, वाचा वैशिष्ट्ये

व्हॉट्सअॅपचे फीचर्स

टू-स्टेप व्हेरिफिकेशन

तूमचे अकाउंट सुरक्षित करण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला व्हॉट्सअॅप अकाउंट रिसेट किंवा पुन्हा ओपन करण्यासाछी ६ अंकी पासवर्डची रज असते. त्यामुळे सिम कार्ड चोरीला गेल्यास चोर कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकणार आहे.

ब्लॉक करणे किंवा रिपोर्ट करणे

जर व्हॉट्सअॅप युजर्संना अज्ञान फोन नंबरवरुन फोन आहे किंवा मेसेज आले. तर त्या नंबरला तुम्ही ब्लॉक करु सखतात. अज्ञान नंबरवरुन आलेल्या लिंक्सवर क्लिक केल्यावर तुमची फसवणूक होऊशकते. त्यामुळे तुम्ही त्या नंबरला Block & Report करु शकतात.

Silence unknown callers

इन्कमिंग कॉल्सवर अधिक गोपनियता आणि नियंत्रण ठेवण्यासाठी Silence unknown callers हे फीचर्स लाँच करण्यात आले आहे. या फीचरमुळे स्पॅम, फ्रॉड आणि अज्ञान व्यक्तींकडून आलेले कॉल्स ओळखले जातात आणि आपोआप सायलेन्स केले जातात.त्यामुळे जर तुम्हाला अज्ञात नंबरवरुन फोन आले तरी ते सायलेन्स होतात.

Whatsapp Features
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com