Nagpur Hit And Run Case: नागपूर हिट अॅण्ड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट; अटक केलेल्या सातव्या आरोपीसोबत सूनेचे २५० व्हॉट्सअॅप कॉल आणि चॅट

7th Accused Arrested Archana Puttevar Killed Her Father In Laws: नागपूरमधील हिट अॅण्ड रन प्रकरणातील सातव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीने या सातव्या आरोपीला २५० व्हाट्सअप कॉल केल्याचं समोर आलं आहे.
नागपूर हिट अॅण्ड रन प्रकरण
Nagpur Hit And Run CaseSaam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपुरमध्ये संपत्तीसाठी सासर्‍यांची अपघाताचा बनाव करून सुपारी देऊन हत्या प्रकरणात सातव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. संकेत घोडमारे, असं या आरोपीचं नाव आहे. संकेत घटनेच्या वेळी सचिनसोबत दुचाकीवर बसून असल्याची माहिती मिळत आहेत. घटना घडताच बाहेरील गोष्टींचा अंदाज आरोपींना यावा, याकरिता संकेत आणि सचिन फोनवरून कनेक्ट असल्याचं समोर आलं आहे.

आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात अर्चनाने सार्थक बागळेला २५० व्हाट्सअप कॉल केले होते, असं समोर आलं (Nagpur Hit And Run Case) आहे. व्हाट्सअप चॅट केले होते, ते डिलीट केल्यानं त्यात काय काय चर्चा झाली. याचा तपास सध्या पोलीस करत आहे.

नागपूरातील हिट अँड रनचा बनाव करत सासऱ्याची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या प्रकरणांमध्ये नवेनवे खुलासे होताना दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात नगररचना विभागात सहाय्यक संचालक पदावर असणाऱ्या अर्चना पुट्टेवार (Archana Puttevar) हिनेच आपल्या सासऱ्याच्या हत्तीची सुपारी दिली होती. या कटात आणखी कोण कोण सहभागी आहे, या सगळ्यांचा तपास पोलीस करत आहे.

नागपूर हिट अॅण्ड रन प्रकरण
Nagpur Hit And Run Case: आधी अपघात नंतर घातपात आता जादूटोणा; हिट अँड रन प्रकरणाला नवा अँगल

अर्चना पुट्टेवार यांनी गडचिरोली कार्यरत असताना अनेक भूमाफियांना मदत केल्याची पोलीस विभागात चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये हे भूमाफिया काही राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची सुद्धा चर्चा (Nagpur News) आहे. सासऱ्यांच्या हत्येचा कटात काही भूमाफियांना मदत केल्याचा संशय पोलिसांना असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. मात्र, त्या दिशेने पोलीस तपास करणार का? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान यामध्ये अर्चना पुट्टेवार यांनी काही ठिकाणी जमिन विकत घेतली का? त्यासाठी पैसा कुठून आला, याचा तपास होणार (Crime News) का? हे सुद्धा पाहावे लागणार आहे.

नागपूर हिट अॅण्ड रन प्रकरण
Nagpur Breaking News: पब्जीचा नाद, वाढदिवसालाच झाला घात! मध्यरात्री तोल जाऊन तलावात पडला; 'बर्थडे बॉय'चा दुर्दैवी मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com