Whatsapp भारतात होणार बंद? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली महत्त्वाची माहिती

Ashwini Vaishnaw On Whatsapp: भारतात सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप बंद होणार का? असा प्रश्न विवेक तनखा यांनी लोकसभेत विचारला होता. यावर आता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले आहे.
Whatsapp भारतात होणार बंद? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली महत्त्वाची माहिती
Ashwini Vaishnaw On WhatsappSaam Tv
Published On

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मेटाने भारतातील व्हॉट्सॲप सेवा बंद करण्याबाबत सरकारला कोणतीही माहिती दिलेली नाही. काँग्रेस नेते विवेक तनखा यांनी विचारलेल्या प्रश्नावर अश्विनी वैष्णव यांनी हे उत्तर दिले आहे.

काँग्रेस नेते विवेक तनखा यांनी विचारले होते की, व्हॉट्सॲपने आपल्या युजर्सचा डाटा शेअर करण्याच्या सरकारच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे भारतातील आपली सेवा बंद करण्याचा विचार करत आहे का? यावर त्यांनी हे उत्तर दिलं.

Whatsapp भारतात होणार बंद? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली महत्त्वाची माहिती
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अंबानी- अदानींचं घेतलं नाव, ओम बिर्ला यांनी घेतला आक्षेप, लोकसभेत काय घडलं? पाहा VIDEO

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले होते की, जर कंपनीला मेसेजचे एन्क्रिप्शन तोडण्यास भाग पाडले गेले तर ते भारतात काम करणे थांबवणार. कंपनीच्या या स्टेटमेंटनंतर भारतातील व्हॉट्सॲप यूजर्स तणावात होते. मेटाने भारताच्या नवीन आयटी नियमांना थेट आव्हान दिले होते. हे नियम गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करतात, असे मेटाच्या वतीने सांगण्यात आले होते.

अश्विनी वैष्णव काय म्हणाले?

अश्विनी वैष्णव म्हणले की, ''राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संबंधित सरकारी सूचना जारी करण्यात आले आहे. हे नियम भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी आणि इतर देशांशी मैत्री राखण्यासाठी आहेत. याशिवाय, सार्वजनिक सुव्यवस्थेशिवाय गुन्हेगारीला उत्तेजन देणारी कोणतीही कृती रोखण्यासाठी ते आहेत.''

Whatsapp भारतात होणार बंद? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली महत्त्वाची माहिती
Rahul Gandhi Video : महाभारत, अभिमन्यू आणि चक्रव्यूह; राहुल गांधी यांचं लोकसभेत आक्रमक भाषण

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी मेसेजिंग तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याबद्दल भारताचे याआधीच कौतुक केले आहे. मार्क झुकेरबर्ग म्हणाले होते की, भारत या क्षेत्रात जगभरात आघाडीवर आहे. 400 मिलियन युजर्ससह भारत व्हॉट्सॲपची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com