अंबानी आणि अदांनी यांच्या नावावरून आज लोकसभेत चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, यात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी काहीही नाही. ते म्हणाले की, ''हे लोक फक्त अंबानी आणि अदानी यांची काळजी घेतात.'' राहुल गांधी यांनी अंबानी आणि अदांनी यांचं नाव घेताच लोकसभेत सत्तापक्षातील खासदारांनी आवाज उठवत यावर आक्षेप घेतला.
अंबानी-अदांनी यांचं नाव घेतल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनीही राहुल गांधी यांना थांबवलं आणि म्हणाले की, ''जे सभागृहाचे सदस्य नाहीत त्यांच्याबद्दल तुम्ही भाष्य करू शकत नाही.'' यावर राहुल गांधी म्हणाले, मी या लोकांना 3,4 किंवा A1 किंवा A2 म्हणू शकतो का? या दोघांची देशाच्या व्यवसायावर पकड असल्याचे ते म्हणाले. त्यांच्याबद्दल बोलायचे आहे. आपण गप्प बसू शकत नाही.''
राहुल गांधी म्हणाले, ''देशातील दलित आणि मागासवर्गीयांना कुठेही स्थान मिळत नाही. त्यांना कॉर्पोरेट इंडिया, नोकरशाही आणि सरकारमध्ये स्थान दिले जात नाही. अर्थसंकल्पीय हलवा समारंभाचे फोटो दाखवत राहुल गांधी म्हणाले की, यात दलित, आदिवासी आणि ओबीसी अधिकारी दिसत नाही. बजेटमध्ये हलवा वाटला जात आहे, पण देशाला मिळत नाही. हे अर्थसंकल्प 20 अधिकाऱ्यांनी तयार केले आहे, म्हणजे त्यांनी भारताला हलवा वाटण्याचे काम केले आहे. त्या लोकांपैकी फक्त एक अल्पसंख्याक आणि एक ओबीसी आहे.''
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, ''जात जनगणनेचा मुद्दा अर्थसंकल्पात मांडावा, अशी माझी इच्छा होती. संपूर्ण देशाला हे हवे आहे. गरीब सामान्य जातीतील लोकांना आणि अल्पसंख्याकांनाही ते हवे आहे.''
यादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन हसताना दिसल्या, तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, ही हसण्याची गोष्ट नाही. राहुल गांधी म्हणाले की, या लोकांना वाटते की, देशातील लोक अभिमन्यू आहेत, पण ते अर्जुन आहेत. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल, तेव्हा आम्ही एमएसपीच्या हमीसाठी कायदा करू. याशिवाय जात जनगणनेसाठीही कायदा करण्यात येणार आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.