Maharashtra Government : सरकारी योजनांच्या जाहिरातींवर राज्य सरकार खर्च करणार २७० कोटी ५ लाख, जीआर काढला

Maharashtra Government News : सरकारी योजनांच्या जाहिरातींवर २७० कोटी ५ लाख राज्य सरकार खर्च करणार आहे. यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय देखील जारी केला आहे.
Maharashtra Government
Debt Burden On MaharashtraSaam Tv
Published On

सूरज मसुरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी राज्यभर मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकारने नागरिकांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजना निवडणुकीआधी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे. या सरकारी योजनांचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकार जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च करणार आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने सरकारच्या विविध योजनांच्या जाहिरातीवर २७० कोटी ५ लाख खर्च करण्याचे जाहीर केले आहे. जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्च करण्याबाबत शासन निर्णय देखील जारी केला आहे.

Maharashtra Government
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का, अजित पवारांनी गेम केला; शिवसेनेचा विश्वासू नेताच फोडला

राज्य सरकारकडून बाह्यप्रसिद्धीसाठी १३६ कोटी ३५ लाख रूपये खर्च केले जाणार आहे. इलेकट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्धीसाठी ३९ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आले आहे. तर डिजिटल माध्यमांसाठी ५१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर राज्यातील आणि राज्याबाहेरील वृत्तपत्रातून प्रसिद्धीसाठी ४० कोटी खर्चाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Government
Maharashtra Politics: अजित पवारांचा सर्वात मोठा खुलासा, महायुतीत सहभागी होण्यापूर्वी काय काय केलं?; सर्व काही सांगितलं

पद्म पुरस्कारांसाठीच्या नावांसाठी राज्य सरकारकडून समिती गठित

२०२५ साली दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठीच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठित करण्यात आली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारांसाठी समिती शिफारस करणार आहे. या समितीत मंत्री दिलीप वळसे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, धनंजय मुंडे, उदय सामंत यांचा समावेश आहे.

या समितीत अपर मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. राज्य सरकारकडून केंद्र सरकारला नावांची शिफारस छाननी करत पाठवली जात असतात. त्यानंतरच केंद्र सरकारकडून २६ जानेवारी २०२५ रोजी पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com