Twitter Down : ट्विटर जगभरात ठप्प, Welcome to X! मेसेजमुळे युजर्स हैराण

Elon Musk Twitter Down :गुरुवारी सकाळी लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Xची सेवा जगभरात ठप्प झाली आहे.
Twitter Down
Twitter DownSaam tv

Twitter Sever Down :

गुरुवारी सकाळी लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Xची सेवा जगभरात ठप्प झाली आहे. X वापरताना काही युजर्सना कोणत्याही टॅबवर कोणतेही ट्विट दिसत नाहीये. याबाबतची तक्रार देखील करण्यात आली आहे.

Downdetector च्या नुसार भारतातील सुमारे १४९ वापरकर्त्यांनी याविषयीची तक्ररार नोंदवली आहे. आउटेज ट्रॅकर्सच्या लाइव्ह आउटेज मॅपनुसार वापरकर्ते दिल्ली, जयपूर, लखनौ, कर्नाटक, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि इतर शहरांमध्ये हॉटस्पॉटसह भारतातून (India) X वर तक्रार नोंदवत असल्याचे आढळले.

Downdetector च्या तपासणीतून असे समजले की, X इतर ठिकाणी जसे की, यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया आणि इतर ठिकाणी सुरळीत सेवा देत आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये X ला मोठ्या प्रमाणात आउटेजचा सामना करावा लागला होता. त्यावेळी X ची सेवा ठप्प का झाली याविषयी कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, पुन्हा काही तासांत सेवा सुरु करण्यात आली.

Twitter Down
IRCTC Tour Package: IRCTC चा नवा टूर पॅकेज! अयोध्या, वाराणसीसह फिरता येणार ८ धार्मिक स्थळांना; बुकिंग खर्च पाहा

यापूर्वी मेटाला गेल्या महिन्यात आउटेजचा सामना करावा लागला, त्यामुळे सोशल मीडियावर अनेक मेम्सही शेअर करण्यात आले आहे. आउटेजमुळे मार्क झुकेरबर्गच्या मेटाला मोठा फटका बसला, त्यामुळे 18 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले.

ही समस्या अजून किती काळ असेल हे सांगता येत नाही. यापूर्वी ही समस्या डिसेंबर महिन्यात आली होती. ज्यामुळे ट्विटरच्या (Twitter) अनेक लिंक्स ओपन करताना अडचणीचा सामना करावा लागत होता. तसेच नवीन ट्विट करताना युजर्सना एक पॉप-अप मिळत आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून मागच्या वर्षभरात ट्विटरच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com