Samsung: सॅमसंग कंपनीने भारतात लाँच केले Galaxy Watch Ultra; प्री बुकींगवर मिळतोय भरघोस डिस्काउंट; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Samsung Company Launch Galaxy Watch Ultra: सॅमसंग कंपनीने भारतात गॅलॅक्‍सी वॉच७, गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा, बड्स३ सीरीज लाँच केले आहे. हे प्रोडक्ट्स प्री ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना चांगला डिस्काउंट देण्यात येत आहे.
Samsung Company Launch Galaxy Watch Ultra
Samsung Company Launch Galaxy Watch UltraSaam Tv
Published On

सॅमसंग ही भारतातील लोकप्रिय कंपनी आहे. कंपनीचे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन प्रोडक्ट्स लाँच करत असते. कंपनीने नुकतेच गॅलॅक्‍सी वॉच७, गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा, बड्स३ सीरीज लाँच केले आहे. हे स्मार्ट वॉचेच प्री ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक ऑफर देण्यात आली आहे

गॅलॅक्‍सी वॉच७ आणि गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रामध्ये एण्ड टू एण्ड वेलनेस अनुभव मिळतो. वॉचचे डिझाइन एकदम युनिक आणि छान आहे. या स्‍मार्टवॉचमध्‍ये टायटॅनियम ग्रेड ४ फ्रेम आणि १० एटीएम वॉटर रेसिस्‍टण्‍स अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत आणि समुद्रामध्‍ये पोहणे, अत्‍यंत प्रखर वातावरणात सायकल चालवणे अशा प्रगत फिटनेस अनुभवांसाठी लांबच्‍या अंतरापर्यंत कार्यरत राहू शकतो.

Samsung Company Launch Galaxy Watch Ultra
Budget 2024: अच्छे दिन येणार, अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त होणार? केंद्राकडून घोषणेची शक्यता

या स्मार्टवॉचमध्ये तुम्ही वर्कआउट सुरु केल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवू शकतात.वर्कआऊटनंतर गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रावरील समर्पित वॉच फेसेसवर त्‍वरित आकडेवारी तपासा. ३,००० नीट्सच्‍या सर्वोच्‍च ब्राइटनेससह गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा प्रखर सूर्यप्रकाशात देखील स्क्रिनवरील बाबी सुस्‍पष्‍टपणे दिसण्‍याची व वाचता येण्‍याची खात्री देतो. लांबच्‍या प्रवासादरम्‍यान कार्यरत राहण्‍यासाठी गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रामध्‍ये गॅलॅक्‍सी वॉच लाइन-अपमधील दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी आहे, जी पॉवर सेव्हिंगमध्‍ये जवळपास १०० तासांपर्यंत आणि एक्‍सरसाइज पॉवर सेव्हिंगमध्‍ये ४८ तासांपर्यंत कार्यरत राहते.

गॅलॅक्‍सी वॉच७, वॉच अल्‍ट्रा, बड्स३ सिरीजसाठी प्री बुक ऑफर्स

गॅलॅक्‍सी वॉच७ प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना ८००० रूपयांचा कॅशबॅक किंवा ८००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळणार आहे. तसेच गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना १०००० रूपयांची मल्‍टी-बँक कॅशबॅक किंवा १०००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल.

Samsung Company Launch Galaxy Watch Ultra
Samsung Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 एकाचवेळी लॉन्च; AI फीचर्स असलेल्या फोनची जाणून घ्या किंमत

वॉच ७ आणि वॉच अल्‍ट्राच्‍या किमती

Model Variant Price

Watch7 Watch7 40 mm BT ची किंमत 29999 रुपये आहे. Watch7 Watch7 40 mm LTE ची किंमत 33999 रुपये आहे. तर Watch7 Watch7 44 mm BTची किंमत 32999 रुपये आहे. Watch7 Watch7 44 mm LTE या वॉचची किंमत 36999 रुपये आहे. तर Watch Ultra Watch Ultra ची किंमत 59999 रुपये आहे.

बड्स ३ सिरीजच्‍या किमती

Model Price

Buds3 ची किंमत 14999 आहे तर Buds3 Proची किंमत 19999 रुपये आहे.

Samsung Company Launch Galaxy Watch Ultra
Car Insurance: पावसाच्या पाण्यात कार बुडाली किंवा वाहून गेली तर विमा मिळतो का? जाणून घ्या नियम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com