Car Insurance: पावसाच्या पाण्यात कार बुडाली किंवा वाहून गेली तर विमा मिळतो का? जाणून घ्या नियम

Car Insurance Policy: सध्या राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसात अनेक कार वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कार वाहून गेल्यावर कारमालकाचे प्रचंड नुकसान होते.
Car Insurance
Car InsuranceSaam Tv
Published On

पावसाळा सुरु झाला असून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पाणी साचल्यामुळे रस्त्यावरुन वाट काढताना नागरिकांना नाकीनऊ येतात. त्याचसोबत अनेकदा पाण्यात वाहने वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसात वाहन वाहून गेल्यावर प्रचंड नुकसान होते. या परिस्थिती विमा कंपन्याकडून कारचा विमा मिळतो का? नुकसान झालेल्या वाहनाची भरपाई मिळते का?असे अनेक प्रश्न कारमालकांना पडलेले असतात. तर याबाबत काही नियम आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.

Car Insurance
ITR : आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? पैसे न आल्यास काय करावं?

जर तुमच्याकडे कार इन्शुरन्स असेल तर तुम्हाला सर्व समस्यांमध्ये विमा मिळतो. नैसर्गिक आपत्ती, अपघात, चोरी या परिस्थितीमध्ये विमा पॉलिसी फायदेशीर आहे. कधी खराब हवामानामुळे वाहनाचे नुकसान झाले तर ते दुरुस्तीसाठी किंवा बदलण्यासाठी विमा कंपन्यांकडून कव्हर मिळते. हे ऐच्छिक धोरण असते. म्हणजेच तुमची इच्छा असल्यास तुम्ही ही पॉलिसी खरेदी करु शकतात. जर तुम्ही अशी पॉलिसी खरेदी केली असेल तर तुम्हाला पूरसदश्य परिस्थितीत वाहनाचे नुकसान झाल्यास, आग लागल्यास किंवा चोरी झाल्यास नुकसान भरपाई मिळू शकते.तुमच्या पॉलिसीवर तुमच्या वाहनाची नुकसान भरपाई अवलंबून असते. जर तुमच्या पॉलिसीत या सर्व गोष्टींचा समावेश असेल तर तुम्हाला नक्कीच नुकसान झाल्याचे पैसे मिळतील.

Car Insurance
Budget 2024: अच्छे दिन येणार, अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त होणार? केंद्राकडून घोषणेची शक्यता

विमा पॉलिसी घेताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

कार विमा पॉलिसी घेताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आपण ज्या राज्यात राहतो तेथील शहरांची माहिती असावी. त्या परिसरात पुरसदृश्य परिस्थिती उद्भवू शकते असं वाटत असेल तर त्यानुसार तुम्ही विमा पॉलिसी खरेदी करावी. स्टँडर्ड काँप्रिहेंसिव पॉलिसीसोबत झिरो डेप्रिशिएशन आणि इंजिन प्रोटोक्शन कव्हर घेतले पाहिजे. स्टँड अलोन पॉलिसीमध्ये पाण्यामुळे इंजिनचे नुकसान झाल्यास कव्हर मिळत नाही. त्यामुळे तुम्ही इंजिन बिघाडासाठी अॅड-ऑन कव्हर घेतले तर कंपनीकडे तुम्ही दावा करु शकतात.

Car Insurance
Petrol Diesel Rate Today: वीकेंडला फिरायला जायचा प्लान करताय? तर तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर चेक करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com