Petrol Diesel Rate Today: वीकेंडला फिरायला जायचा प्लान करताय? तर तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर चेक करा

Petrol Diesel Rate 20th July 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.
Petrol Diesel Rate Today In Maharastra
Petrol Diesel RateSaam Tv
Published On

राज्यात आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहे. आज शनिवार असल्याने अनेकजण वीकेंडला बाहेर जाण्याचा प्लान करत असतील. जर तुम्हीही वीकेंडला बाहेर जाण्याचा प्लान करत असाल तर सर्वप्रथम तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव चेक करा. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा फरक पडलेला नाही.

पेट्रोलचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलवरील वॅट कर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव ६५ पैशांनी कमी झाले आहेत. हे दर आता स्थिर आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

Petrol Diesel Rate Today In Maharastra
Gold-Silver Rate Fall : पुढच्या वर्षी सोनं १ लाख रुपये तोळा होण्याची शक्यता; वाचा आजचा भाव घसरला की वाढला!

महानगरांमधील इंधनाचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १००.७५ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

Petrol Diesel Rate Today In Maharastra
Budget 2024: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आठवा वेतन आयोग लागू झाल्यास पगारात किती वाढ होणार? वाचा

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

पुण्यात पेट्रोलची किंमत १०३.९३ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.४६ रुपये प्रति लिटर आहे.ठाण्यात पेट्रोल १०३.८९ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.४० रुपये आहे.साताऱ्यात पेट्रोलची किंमत १०५.३४ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.८१ रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोल १०४.६९ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.२० रुपये आहे.नागपूरमध्ये पेट्रोल १०४.१९ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९०.७४ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.९९ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९०.८० रुपयांवर विकले जात आहे.

Petrol Diesel Rate Today In Maharastra
Bajaj च्या CNG बाईकची बाजारात तुफान मागणी! आज बुक केल्यास कधी मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com