पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर
'हिट अॅण्ड रन'च्या पुन्हा एका घटनेने नागपूर आता हादरलं आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन हिट अँड रनच्या घटना घडल्या आहेत. हा अपघात ७ जूलैच्या रात्री घडली. एका घटनेत खर्रा विकत घेण्यासाठी जात असलेल्या दुचाकी चालकाला अज्ञाताने धडक दिली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. राहुल खैरवार, असं २६ वर्षीय मृ्त्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
नागपूरमधील'हिट अॅण्ड रन'ची घटना
नागपूरमधील दुसरी 'हिट अॅण्ड रन'ची घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतच घडलीय. मॉर्निंग वाकला जात असतांना ५६ वर्षीय प्रवीण गांधी नावाच्या व्यक्तीला भरधाव कारने उडवलं. या घटनेत प्रवीण गांधी जखमी झालेत. ते रेल्वेत कार्यरत असल्याची माहिती मिळतेय. गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करत याप्रकरणाचा तपास सुरू (Nagpur Hit And Run) केलाय.
नागपुरमधील दुसरा भीषण अपघात
नागपूरमध्ये अपघाताचं सत्र सुरूच असल्याच समोर (Nagpur News) येतंय. आज सकाळी भरधाव स्कूल बसच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू झालाय. हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत ही दुर्घटना घडली. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. रत्नाकर रामचंद्र दीक्षित वय ६३ वर्ष, असं मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती पोलीसांनी (Accident News) दिलीय.
कसा झाला अपघात?
मृत रत्नाकर दीक्षित सायकलने आठ जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास छोटा ताजबाग ते तुकडोजी चौक या मार्गाने जात होते. तेव्हा मागून भरधाव वेगाने येणाऱ्या 'मोंटफोर्ट स्कुल' च्या बसने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दीक्षित गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल केल (Latest Accident News) होतं. मात्र, उपचार सुरू असताना रत्नाकर दीक्षित यांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपी बस चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.