सचिन कदम, ता. १९ जुलै २०२४
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. काल जालन्यात वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. ही अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून केवळ दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाले आणि हा कंटेनर दुसऱ्या कंटेनरला धडक दिली पुढे या कंटेनरची मारुती आर्टीका, स्विफ्ट डिझायर, वॅगनर यांना धडक लागली.
सुदैवाने तीनही कारमधील प्रवासी सुखरूप असून अपघातग्रस्त कंटेनरच्या चालक आणि क्लिनर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींवर MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.
साताऱ्याहून वारकऱ्यांना घेऊन आलेल्या ट्रेम्पोचा काल दुपारी सिंहगडाच्या घाट रस्त्यावर अपघात झाला. घाटातील धोकादायक वळण ठरलेल्या ११ हजार पॉइंटजवळ टेम्पो दरीच्या दिशेने कोसळला, मात्र मोठ्या दगडी कठड्यावर मागील चाके अडकल्याने मोठी जिवीतहानी टळली. वारी पूर्ण करून परतीच्या मार्गावर निघालेले २५ वारकरी सहकुटुंब सिंहगडावर पर्यटनासाठी आले होते. यामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकही होते.यातील काही वारकरी डोणजे गोळेवाडी भागातील होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.