पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा; दिवसाढवळ्या आईस्क्रीम व्यावसायिकावर गोळीबार
Pune Crime : Saam tv

Pune Crime : पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा; शहरात दिवसाढवळ्या आईस्क्रीम व्यावसायिकावर गोळीबार

Pune Crime news : पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील सासवडमध्ये दिवसाढवळ्या आईस्क्रीम व्यावसायिकावर गोळीबार झाला आहे.
Published on

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्याच्या पुरंदरमधील सासवड शहरात दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला आहे. शहरात दिवसाढवळ्या आईस्क्रीम व्यावसायिकावर गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या पुरंदरमधील सासवड शहरात गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना घडली. सासवड शहराती तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. तीन अज्ञात व्यक्तीकडून आईस्क्रीम व्यावसायिक राहुल नामदेव टिळेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. आईस्क्रीम व्यावसायिक टिळेकर यांच्या पोटात गोळ्या मारण्यात आल्या आहेत.

पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा; दिवसाढवळ्या आईस्क्रीम व्यावसायिकावर गोळीबार
Kalyan Crime News : एकाच रात्रीत चार दुकानासह एका घरात चोरी; चोरट्यांनी लांबविला लाखोचा मुद्देमाल

या गोळीबारात आईस्क्रीम व्यावसायिक राहुल नामदेव टिळेकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सासवड एसटी स्टँडसमोर ही गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. गोळीबारात जखमी झालेल्या आईस्क्रीम व्यावसायिक राहुल नामदेव टिळेकर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

चंद्रपूरही गोळीबाराने हादरलं

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील कापड दुकानात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबाराच्या घटनेत दुकानात काम करणारा कार्तिक साखरकर जखमी झाला. मास्क आणि टोपी घातलेले तीन हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. तिन्ही हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. एकाने दुकानाच्या प्रवेशद्वारावर बॉम्ब टाकला. त्यानंतर इतर दोन साथीदारांनी दुकानाच्या आत प्रवेश करून गोळीबार केला. सुदैवाने या हल्यात दुकानातील इतर कामगार सुखरूप आहेत .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com