Chole Bhature Icecream
Chole Bhature IcecreamSAAM DIGITAL

Chole Bhature Icecream: ही डिश कोणीच खाऊ शकत नाही; छोले भटुऱ्यांचा चक्क आईस्क्रीम रोल, VIDEO व्हायरल

Viral Icecream Video: जर तुम्हाला छोले भटुरे खाण्याची आवड असेल
Published on

Chole Bhature Icecream Viral Food Video

जर तुम्हाला छोले भटुरे खाण्याची आवड असेल आणि ते पाहिल्यानंतर तुमच्याही तोंडाला पाणी सुटत असेल, तर हा व्हिडीओ एकदा नक्की पहा. कदाचित हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही छोले भटुरे खाणे बंद कराल. आतापर्यंत तुम्ही छोले भटुरे हे वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाताना बघितलं असतील; पण मार्केटमध्ये छोले भटुऱ्यांचा असा एक प्रकार आला आहे की, जे खाताना तुम्ही १०० वेळा विचार कराल. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्राला अपरंपार अशी खाद्य सस्कृंती लाभली आहे. महाराष्ट्र नव्हे तर बाहेरील राज्यातील खाद्य सस्कृंती ही जग प्रसिध्द आहे. त्यातच खवय्यांचीही कमी देशात नाही. लोकांना खाद्यपदार्थ विकणारे विविध आयडिया शोधत असतात. त्यासाठी विविध फुडवर एक्स्पेरिमेंट्स करतात त्याचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच सोशल मीडियावर 'छोले भटुरे आईस्क्रीम रोल' व्हायरल होत आहे. नेमका कसा तयार करत आहेत ते आपण पुढील व्हिडीओत बघुयात...

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आपल्याला दिसत आहे की ,व्हिडीत दिसणारी व्यक्ती भटुरा हातात घेऊन आहे की नंतर भटुऱ्याचे लहान लहान तुकडे करताना दिसते. नंतर त्यामध्ये छोले आणि दूध घालून त्याला एकत्र करते. मग त्याचे लहान लहान रोल्स बनवते. हे बनवलेले रोल्स एकदम आईस्क्रीम सारखे दिसत आहे. शेवटी एका डिशवर ते रोल्स ठेऊन त्यांना कांदा ,छोले आणि हिरव्या चटणीन सजवतो.

@foodie_tshr या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. सोशल मीडियावर सध्या अशाच प्रकारच्या फुड व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्यात. या व्हिडीओंना लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल व्हिडीओ छोले भटुरे आणि आइस्क्रीमप्रेमींना आवडलेला नाही हे आलेल्या प्रतिक्रियेवरुन समजते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com