सोने तसेच चांदीच्या दरांमध्ये आज मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदी खरेदीसाठी दागिन्यांच्या दुकानात गर्दी केली आहे. सोन्याचा भाव या वर्षीच्या शेवटपर्यंत किंवा पुढल्या वर्षी १ लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भाव वाढ इतक्या मोठ्याप्रमाणात झाल्यावर सामान्य नागरिकांना सोने खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आज काही प्रमाणात भाव घसरल्यानंतर नागरिकांनी सोने खरेदीसाठी दुकानांबाहेर मोठी गर्दी केली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ४५० रुपयांनी खाली घसरला आहे. त्यामुळे आज एक तोळा सोन्याचा भाव ६८,३०० रुपये इतका आहे. तर १०० ग्राम सोन्याचा भाव ६,८३,००० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५४,६४० रुपये आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ६,८३० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट प्रति तोळा सोन्याचा भाव आज ७४,५०० रुपये इतका आहे. तसेच ८ ग्राम सोन्याचा भाव ५९,६०० रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ७,४५० रुपये आहे. त्यासह १०० ग्राम सोन्याचा भाव ७,४५,००० रुपये इतका आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव
आज १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ५५,८८० रुपये आहे. तर १०० ग्राम सोन्याचा भाव ५५,८८० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव आज ४४,७०४ रुपये इतका आहे. १ ग्राम सोन्याचा भाव ५,५८८ रुपये इतका आहे.
सोन्याचा भाव १ लाखांवर पोहचणार?
काही अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा भाव या वर्षीच्या शेवटपर्यंत किंवा पुढल्या वर्षी १ लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता काही आहे. सध्या जागतिक मंदी वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता असल्याचं अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. नागरिकांमध्ये चांदीचा वापर देखील वाढला आहे. त्यामुळे याच वर्षाच्या अखेरपर्यंत चांदी देखील लाखांच्या पार जाण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
चांदीचा भाव काय?
आज १०० किलोग्राम चांदीचा भाव १४५ रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे चांदीची किंमत ९३,२५० रुपये प्रति किलोग्राम आहे. मुंबई , पुणे, नवी दिल्ली, पटना, जयपुर, लखनऊ, अहमदाबाद, कोलकत्ता, लुधियाना अशा सर्व शहरांत आज चांदीचा भाव ९३,२५० रुपये प्रति किलोग्राम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.