Gold Silver Rate Hike : सोन्याचा भाव पुन्हा वाढला; चांदीची चकाकीही महागली, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Silver Rate Hike (15 June 2024): आज १०० ग्राम सोन्याच्या दरात ६,६०० रुपयांची तेजी आली आहे. एवढ्या मोठ्या किंमतीने सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे आजचा भाव किती आहे ते पाहू.
Gold Silver Rate Hike (15 June 2024)
Gold Silver Rate Hike Saam TV

फादर्स डेच्या आदल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर कमी जास्त होत आहेत. अशात आज १०० ग्राम सोन्याच्या दरात ६,६०० रुपयांची तेजी आली आहे. एवढ्या मोठ्या किंमतीने सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे आजचा भाव किती आहे ते पाहू.

आजचा २४ कॅरेटचा भाव

आज २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६०० रुयांनी वाढून सोन्याचा भाव ७,२७,००० रुपये इतका आहे. १० ग्राम सोन्याचा भाव ७२,७०० रुपये, तर ८ ग्राम सोन्याची किंमत ५८,१६० रुपये आहे. यासह १ ग्राम सोन्याची किंमत ७,२७० रुपये आहे.

Gold Silver Rate Hike (15 June 2024)
Business News : निकालाच्या दिवशीच महागाईचा भडका; जीवनावश्यक वस्तू महागल्या, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

२२ कॅरेट सोन्याची किंमत

२२ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६६,५०० रुपये इतकी आहे. १० ग्राम सोन्याची किंमत ६६,६५० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव ५३,३२० रुपये आणि १ ग्राम सोन्याचा भाव ६,६६५ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील सोन्याचा भाव

नवी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२७० रुपये प्रति ग्राम आहे.

मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२५५ रुपये प्रति ग्राम आहे.

पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२५५ रुपये प्रति ग्राम आहे.

कोलकत्तामध्ये सोन्याचा भाव ७,२५५ रुपये प्रति ग्राम आहे.

चांदीचा भाव

आज चांदीचा भावही वाढला आहे. चांदीच्या किंमती ५०० रुपयांनी वर आल्यात. त्यामुळे १ किलो चांदीची किंमत ९१,००० रुपये इतकी आहे. काल हिच किंमत ९०,५०० रुपये होती.

नवी दिल्लीत चांदीची किंमत ९१,००० रुपये प्रति किलो आहे.

मुंबईत चांदीची किंमत ९१,००० रुपये प्रति किलो आहे.

पुण्यातही चांदीची किंमत ९१,००० रुपये प्रति किलो आहे.

नागपूरमध्ये देखील चांदीची किंमत ९१,००० रुपये प्रति किलो आहे.

नाशिक आणि औरंगाबादमध्येही चांदीची किंमत ९१,००० रुपये प्रति किलो आहे.

Gold Silver Rate Hike (15 June 2024)
Gold Rate Hike 2024 : नवीन वर्षात सोन्याचा भाव वाढणार? जागतिक पातळीवर सोन्याला झळाळी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com