Gold Rate Hike 2024 : नवीन वर्षात सोन्याचा भाव वाढणार? जागतिक पातळीवर सोन्याला झळाळी

Gold Price Hike Reason : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहे. अशातच लवकर सोन्याच्या किमती नवीन रेकॉर्ड बनवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्ल्ड गोल्डच्या रिपोर्टनुसार २०२४ मध्ये राजकीय तणाव, सेंट्रल बँकांद्वारे सोने खरेदी आणि मंदीमुळे सोन्याच्या भावात पुन्हा झळाळी पाहायला मिळू शकते.
Gold Rate Hike 2024
Gold Rate Hike 2024 Saam tv
Published On

Why Is Gold Price Increasing In India :

दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव नरमले होते. परंतु, डिसेंबर महिना सुरु झाला आणि सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांना टेन्शन आले.

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहे. अशातच लवकर सोन्याच्या (Gold) किमती नवीन रेकॉर्ड बनवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्ल्ड गोल्डच्या रिपोर्टनुसार २०२४ मध्ये राजकीय तणाव, सेंट्रल बँकांद्वारे सोने खरेदी आणि मंदीमुळे सोन्याच्या भावात पुन्हा झळाळी पाहायला मिळू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार येत्या वर्षात अमेरिका आपल्या व्याजदराच्या कपातीमध्ये बदल करुन ढासळलेली अर्थव्यवस्था पुन्हा स्थिर करु शकते. यामुळे देशात पुन्हा मंदीचे सावट पाहायला मिळू शकते. यासाठी काही गुंतवणुकदार आपल्या सुरक्षित भविष्यासाठी सोने खरेदी करु शकता.

Gold Rate Hike 2024
Petrol Diesel Rate (27th December): मुंबई-पुण्यासह नागपूरमध्ये पेट्रोल- डिझेलचा आजचा भाव किती? जाणून घ्या

वर्ल्ड गोल्डच्या रिपोर्टनुसार यामध्ये इकोनॉमीच्या कमी होण्याऐवजी ती अधिक प्रमाणात वाढली तर सोन्याच्या किमतीमध्ये घट होऊ शकते. यामध्ये फक्त ५ ते १० टक्क्यांनी घट होऊ शकते.

रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, अमेरिकेमध्ये इकोनॉमी मंदावेल पण काही काळानंतर पुन्हा झळाळी येऊ शकते. जागतिक पातळीवर सोन्याच्या किमती (Price) मंदावल्यामुळे २५ ते ५५ टक्के घट होऊ शकते. त्यामुळे सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

Gold Rate Hike 2024
Bank Holiday In January 2024 : जानेवारी महिन्यात १६ दिवस बँका राहाणार बंद, एका क्लिकवर पाहा सुट्टयांची यादी

मागच्या वर्षभरात अमेरिका, यूरोप, भारत (india) आणि तैवानमधील गुंतवणुकदारांनी सोन्याच्या गुंतणूकीत उच्चांकाचा टप्पा गाठला आहे. अशातच वर्षभरात जानेवरीपासून सप्टेंबरपर्यंत सेंट्रल बँकेने ८०० मॅट्रिक सोने खरेदी केले. त्यामुळे नवीन वर्षात सोनं पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड बनवेल असे म्हटले जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com