Business News : निकालाच्या दिवशीच महागाईचा भडका; जीवनावश्यक वस्तू महागल्या, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Prices of Household Goods Increased : प्रत्येक घराघरात वापरल्या जाणाऱ्या गृहउपयोगी वस्तू म्हणजे फ्रिज, वॉशिंगशीन यांवर जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत. २ ते ५ टक्क्यांनी सर्वच वस्तुंवरील किंमती वाढवण्यात आल्यात.
Prices of Household Goods Increased
Business NewsSaam TV
Published On

आज लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झालीये. अशात सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढणारी माहिती समोर आली आहे. प्रत्येक घराघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गृहउपयोगी वस्तू म्हणजे फ्रिज, वॉशिंगशीन यांवर जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत. २ ते ५ टक्क्यांनी सर्वच वस्तुंवरील किंमती वाढवण्यात आल्यात.

Prices of Household Goods Increased
How Voters Increased in 20 years | गेल्या २० वर्षांत किती वाढले मतदार? #shorts

इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, होम अप्लायन्स निर्माता सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने गुरुवारी आपल्या बिझनेस पार्टनर्सला इनपुट खर्च वाढल्याचे सांगितले होते. इनपुट खर्च वाढल्याने आता सर्व वस्तुंवरील खर्च वाढत आहेत.

हॅवेल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनिल राय गुप्ता यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तिमाहीत तांबे आणि ॲल्युमिनिअमच्या किंमती वाढल्या आहेत. परिणामी एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरच्या किंमती सुद्धा ५ ते ७ टक्क्यांनी वाढताना दिसत आहेत.

रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह यासह अन्य इलेक्ट्रिक वस्तूंवरील किंमतींमध्ये २ ते ५ टक्क्यांनी वाढ होत आहे. महागाईचा भडका उडाल्याने सामान्यांच्या खिशाला याने कात्री लागताना दिसतेय. अन्नधान्याच्या किंमतींध्ये तांदूळ आणि डाळींचे दर वाढले आहेत. तर पालेभाज्यांच्या किंमतीही वाढल्यात.

Prices of Household Goods Increased
Vegetable Price Increases: सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! लसणाची फोडणी महागली, पालेभाज्यांचे दरही गगनाला भिडले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com