प्रत्येकी व्यक्ती पैसे मिळवण्यासाठी दिवसभर कठोर परिश्रम करत असतो परंतु, कामात यश मिळत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. अनेकजण नोकरी बदलतात किंवा कामात काही ना काही नवीन काम सरु करण्याचा प्रयत्न करतात.
वास्तुशास्त्रात (Vastu Tips) नवीन काम सुरु करण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही नवीन व्यापार करण्याचा विचार असाल तर तुम्हाला मदत होईल. नवीन व्यापार सुरु केल्यानंतर अनेकदा घरात नकारात्मकता जाणवते. तसेच आपापसात वाद देखील होतात.
कोणतेही नवीन काम सुरु करण्यापूर्वी योग्य जागा निवडा. तसेच शुभ ठिकाणही निवडा.
शुभ मुहूर्तावर काम सुरु केल्यास यश मिळते असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.
दुकान किंवा ऑफिसमध्ये बसण्याची दिशा ही अधिक महत्त्वाची मानली जाते. यासाठी तुम्ही दुकानात किंवा ऑफिसमध्ये नैऋत्य दिशेला बसा. योग्य दिशेला बसल्याने कामात यश मिळते.
दुकानात किंवा ऑफिसमध्ये टेबल आणि खुर्च्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. वास्तुनुसार टेबल आणि खुर्च्यावरील घाणामुळे नकारात्मक ऊर्जा येते.
दुकानात किंवा ऑफिसमध्ये फिश टँक ठेवत असाल तर रखडलेले पैसे मिळतात. तसेच पैशांच्या अनेक समस्यांपासून सुटका होते.
वास्तुशास्त्रानुसार दुकान किंवा ऑफिसमध्ये पांढरा, क्रिम किंवा हलक्या रंगाचा वापर करा. या रंगांमधून सकारात्मकता मिळते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.