Pandharpur News: आषाढी वारीला गेलेले कीर्तनकार अजय महाराज बावस्करांची आलीशान कार जाळली, VIDEO

Kirtankar Ajay Barskar Maharaj Car Burnt On Ashadhi Wari: आषाढी वारीला आलेल्या कीर्तनकार अजय महाराज बारस्करांची गाडी जाळल्याची घटना घडलीय. ही घटना पंढरपूरमधून समोर आलीय.
अजय महाराज बावस्करांची आलीशान कार जाळली
Kirtankar Ajay Barskar Maharaj Car BurntSaam Tv
Published On

भरत नागणे, साम टीव्ही पंढरपूर

पंढरपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. अहमदनगर येथील कीर्तनकार अजय महाराज बावस्कर यांची आलीशान कार पंढरपूरमध्ये जळाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बावस्कर महाराजांची कार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. मागील काही दिवसांपूर्वी बावस्कर महाराज यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती, त्यानंतर ते जास्तच चर्चेत आले आहेत.

काय आहे प्रकरण?

अहमदनगर येथील कीर्तनकार अजय महाराज बारस्कर आषाढी वारीसाठी १६ तारखेला पंढरपुरात आले होते. काल एकादशीच्या निमिताने ते पंढरपूरातच (Pandharupur News) होते. त्यांनी पंढरपूर येथील ६५ एकरच्या पार्किंगमध्ये गाडी लावलेली होती. त्यानंतर ते गाडी परत घेण्यास गेले असता त्यांची गाडी जळाल्याचं निदर्शनास आलं. गाडीचा जळून कोळसा झालाय. कोणताही अवशेष शिल्लक नसल्याचं दिसत आहे.

केव्हा घडली घटना?

परवा मध्यरात्री ते काल दुपारच्या दरम्यान गाडी अज्ञाताने जाळल्याचा प्रकार समोर (Kirtankar Ajay Barskar Maharaj Car) आलाय. भटुंबरे गावातील पंडीत शेंबडे यांच्या शेतात पार्क केलेली अजय बावस्कर यांची गाडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर अजय महाराज बावस्कर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलीस गाडी कोणी जाळली याचा शोध घेत (Ashadhi Wari) आहेत.

अजय महाराज बावस्करांची आलीशान कार जाळली
Ashadhi Wari 2024: विठू नामाच्या गजरात पंढरपूर दुमदुमलं, CM शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न Photo

पोलीस तपास सुरू

किर्तनकार अजय महाराज बावस्कर यांनी मागील काही दिवसांपासून त्यांना सतत धमक्या येत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. त्याच प्रकरणातून तर बावस्कर यांची गाडी जाळली गेली नसेल ना, असाही संशय व्यक्त केला जातोय. काही दिवसांपूर्वी बावस्करांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange) टीका केली होती. त्यानंतर देहू संस्थानकडून अजय बावस्कर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.

अजय महाराज बावस्करांची आलीशान कार जाळली
Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीचा उपवास कसा सोडावा? काय खावं अन् काय नाही? जाणून घ्या सर्वकाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com