Ashadhi Ekadashi Fasting Tips: विठू नामाच्या गजराने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमला आहे. विठ्ठल भक्तीचे मंत्रमुग्ध वातावरण चहुबाजूला पाहायला मिळत आहे. अनेक विठ्ठल भक्तांनी आज उपवास केला आहे. कारण वारकऱ्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकीला खूप महत्व आहे. आषाढी एकादशीचा उपवास कधी आणि कसा सोडावा? जाणून घेऊयात.
आषाढी एकादशीला विठुरायाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घ्यायला वारकरी आतूर असतात. असंख्या वारकरी उपवास करून विठुरायाच्या दर्शनाला जातात. आषाढी एकादशीचा उपवास एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच द्वादशीला सोडावा. कारण वारकरी संप्रदायात द्वादशीला मोठं महत्व आहे.
आषाढी एकादशीचा उपवास पावसात येत असल्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. दमट वातावरणामुळे पचनशक्ती मंदावते त्यामुळे उपवासाचे पदार्थ खाताना थोडी विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकांना उपवासात पित्ताचा त्रास होतो. अशावेळी उपवास करताना सकाळी विविध फळांचे सेवन करू शकता. तसेच रात्री पाण्यात भिजवलेले ड्राय फ्रूट्स खा. यामुळे उपवासात शरीराला ताकत मिळते आणि पोट दिर्घकाळ भरल्यासारखे वाटते. तसेच उपवास सोडल्यावर लगेच मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे ॲसिडीटी होऊ शकते. उपवासात चहा टाळावा. कारण पित्तचा धोका वाढतो. उपवासाच्या दिवशी सकाळी दूध आणि फळांचा रस प्यावा. यामुळे पचनशक्ती चांगली होते. उपवासानंतर कधीही हलका आहार घ्या. उपवास कधीही गोड पदार्थ खाऊन सोडावा. गोड पदार्थामुळे शरीरात ऊर्जा निमार्ण होते. कारण यामध्ये कर्बोदक आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात. गोड रताळ्याची खीर खाऊन उपवास सोडा.
रताळ्याची खीर बनवण्यासाठी रताळे, तूप, गूळ, दूध, जायफळ पूड, वेलची पूड,ड्राय फ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
उपवासाची रताळ्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवून उकडवून घ्या. त्यानंतर त्यांची सालं काढून रताळे मॅश करा. आता एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये उकडलेले मॅश रताळे, दूध आणि गूळ घालून छान एकत्र करून घ्या. विरघळल्या गूळाच्या मिश्रणात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि आवडीनुसार ड्राय फ्रूट्स घाला. मंच आचेवर ५ मिनिटे खीर शिजवून घ्या. स्वादिष्ट रताळ्याची खीर तयार झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.