Ashadhi Ekadashi Celebrations: विठू नामाच्या गजराने कामगारांची पंढरी दुमदुमली; रेल्वे प्रवाशांकडून आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Ashadi Ekadashi Mumbai Train Video: मुंबईत रेल्वे प्रवासी आणि भजनी मंडळाने रेल्वे स्थानकावर आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली.
Ashadi Ekadashi Celebrations
Ashadi Ekadashi CelebrationsSaam tv

निवृत्ती बाबर

Mumbai News: आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरासहित राज्यभर जल्लोष पाहायला मिळत आहे. राज्यभरातील श्री विठ्ठलाच्या मंदिरात भक्तांनी गर्दी केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पालखीची मिरवणूक काढण्यात येत आहे. या श्री विठ्ठलाच्या भक्तीत मुंबईकर देखील तल्लीन झाल्याचे दिसले. मुंबईतील लोकल ट्रेनचे प्रवासी आणि भजनी मंडळाने चर्चगेट रेल्वे स्थानकावर आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली. (Latest Marathi News)

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर विठू नामाच्या गजराने दुमदुमली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विठू नामाचा गजर केला जात आहे. या विठू नामाचा गजर मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये देखील ऐकायला मिळाला.

Ashadi Ekadashi Celebrations
Mumbai Dam Water Level : मुंबईकरांना दिलासा! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकलमध्ये भजनी मंडळानी आणि रेल्वे प्रवाशांनी आषाढी एकादशीनिमित्त भजन म्हणत साजरी केली. रेल्वे प्रवाशांनी चर्चगेट स्थानकात भजनी मंडळांनी आषाढी एकादशी पारंपरिक पद्धतीने साजरी केली. रेल्वे प्रवाशांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा केल्याची निदर्शनास आले. यामध्ये पोलीस देखील सामील झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये देखील विठूनामाचा गजर अनेक शाळांमध्ये गजर दिसत आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये भक्तीमय वातावरणात झाले आहे. अनेक लहान मुलांनी आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक वेशभूषा केली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक शिर्डीत दाखल

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे साईबाबांना विठ्ठल स्वरूप मानून हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. साई समाधीला तुळशी पत्रांचे आच्छादन तर साई मूर्तीला देखील तुळशीची माळ घालण्यात आली आहे.

Ashadi Ekadashi Celebrations
Ashadhi Ekadashi Wari: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा; विठ्ठलनामाच्या गजराने पंढरपूर दुमदुमले

मुख्यमंत्र्यांची सपत्निक विठुरायांची शासकीय पूजा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. या पूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, सुपुत्र श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांच्यासह शिंदे कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com