रुपाली बडवे
Mumbai News : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात 24 तासात 1.68 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये काल 7.26 टक्के पाणीसाठा होता. तर 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानंतर हाच पाणीसाठा 8.94 टक्के झाला आहे.
मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे 7 धरण आणि भातसा धरणातील शिल्लक पाणीसाठा मिळून मागील 24 तासात 12.57 टक्क्यांहून वाढून 14.61 टक्के झाला आहे. म्हणजे एकूण पाणीसाठ्यामध्ये जवळपास 2.04 टक्के पाणीसाठा वाढला आहे. तुळसी आणि विहार धरणामध्ये मागील 24 तासात सर्वाधिक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
अप्पर वैतरणा - 00%
मोडक सागर- 3.1 %
तानसा - 3.11%
मध्य वैतरणा- 2.65 %
भातसा - 1.02%
विहार - 4.61%
तुळसी -7.18 %
मुंबई महापालिकेने 1 जुलैपासून 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. मात्र धरण क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दिवसांमध्ये अशाच पद्धतीने धरण क्षेत्रात पाऊस पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन या निर्णयासंदर्भात फेरविचार करू शकते. मात्र सध्या तरी 1 जुलैपासून मुंबईमध्ये पाणीकपातीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.