ITR : आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? पैसे न आल्यास काय करावं?

income tax : आयटीआर भरण्यासाठी दिलेला पुरेसा वेळ आता संपत आलेला आहे. आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? याबद्दल जाणून घ्या.
income tax
ITRSaam Tv
Published On

आयकर रिटर्न भरण्याची शेवटची मुदत आता अत्यंत जवळ आली आहे. तुम्ही जर ३१ जुलै २०२४ पर्यंत कोणत्याही दंडाशिवाय तुमचा ITR दाखल करु शकता. सध्या आर्थिक वर्ष २०२३ आणि २४ आणि वर्ष २०२४ आणि २५ साठी प्राप्तिकर विवरण भरण्याची शेवटची तारीख या महिन्याच्या ३१ जुलैपर्यंत आहे. या तारखेत वाढ होण्याची कोणतीही शक्यता नाही.

income tax
Business Tips : नवीन व्यवसाय सुरू करताय? 'या' टिप्स फॉलो करा, महिन्यात व्हाल मालामाल

लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, टॅक्स रिफंडसाठी वेळेवर आयटीआर फाइल करणे महत्त्वाचे आहे. आयकर विभागाच्या 'www.incometac.gov.in'या वेबसाइटवरुन तुम्ही घरच्या घरी आरामात ITR ऑनलाइन दाखल करु शकता. आयटीआर फॉर्म भरल्यानंतर ,तुमचे रिटर्न ऑथेंटिकेट करण्यासाठी ई-व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जाणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्ड(Aadhar Card) तसेच नेट बँकिंग क्रेडेंशियल्सवरुन ओटीपीद्वारे ई-व्हेरिफिकेशन करु शकता. ई- व्हेरिफिकेशनंतर आयकर विभाग तुमच्या रिटर्नचे योग्य मूल्यांकन करेल. जर सर्व काही योग्य असेल तर विभाग तुम्हाला पडताळणी पाठवेल आणि जर त्यात परतावा मिळाला तर तुम्हाला सूचना पाठवली जाईल.

ऑनलाइन कर परतावा कसा मिळवावा?

नोटीसमध्ये कर परताव्याचा जर कोणताही उल्लेख असल्यास विभाग तुमच्या बँक खात्यात पैसे (Money)हस्तांतरित करण्याची प्रकिया सुरु करेल. या प्रक्रियेस चार ते पाच आठवडे लागतात. तुम्ही जर विभागाच्या वेबसाइटवर परताव्याची स्थिती तपासू शकता.

आयकर परताव्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या

पूर्व-प्रमाणिक बँक खाते

आयकर विभाग फक्त ज्या बँक खात्यात परतावा हस्तांतरिर करतो जे पूर्व-प्रमाणित आहेत. या सर्व अर्थ असा की तुमच्या पॅनशी लिंक केलेले बँक खाते तपशील रिफंज प्रक्रियेपूर्वी इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर सत्यापित केले जावे.

बँक खात्यात तपशील योग्य असावा

तुमचा ITR भरताना तुम्हाला ज्या बँक(Bank) खात्यात परतावा मिळवायता असेल त्या खात्यात योग्य तपशील भरा. बँक खात्याच्या तुलनेतील काही त्रुटींमुळे परतावा मिळण्यास उशिर होऊ शकतो.

परतावा न मिळाल्यास काय करावे

ITR मधील त्रुटींची सुधारणा करा- प्राप्तिकर विभागाची अधिसूचना तुमच्या दाखल केलेल्या आटीआरमध्ये काही प्रकारची चुक (mistake)दर्शवते. तर तुम्ही ई-फायलिंग पोर्टलद्वारे सूचना पाहू शकता.

ईमेल तपासणे

विभाग तुमच्या परताव्याच्या कोणत्याही स्थितीबद्दल अपडेट देणारे ईमेल पाठवू शकतो. या ई-मेलद्वारे तुम्हाला या प्रक्रियेत विलंब होणार असल्याती सूचना देऊ शकतो तसेच तुम्ही महत्त्वाची माहितीही विचारू शकता.

ऑनलाइन रिफंड स्टेटस ट्रॅकर

आयकर (Income tax)विभागाती वेबसाइट तुमच्या रिफंडची स्थिती तपासण्यासाठी एक माध्यम प्रदान करते.तुमचा पॅन आणि मूल्यांकन वर्ष तपशील टाकून तुम्ही संपूर्ण अहवालाचा मागोवा घेऊ शकता.

income tax
Business सुरू करण्यासाठी MSME मध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे का? काय आहेत फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com