अक्षय बडवे
Pune News : पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन औषध खरेदी महागात पडली आहे. ऑनलाईन औषधे विकण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची १.२३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पुणे पोलिसांनी बंगालमध्ये जाऊन या सायबर चोरट्याला अटक केली आहे.
याप्रकरणी खराडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी समीर नरेश रॉय (वय २१ वर्ष) याला पश्चिम बंगालच्या दिनाजपूर येथून अटक केली आहे. (Crime News)
ज्येष्ठ नागरिकाने जानेवारी महिन्यात ऑनलाइन पद्धतीने औषधे मागवली होती. औषधांचे कुरियर कुठपर्यंत आले आहे, याबाबतची माहिती घेण्यासाठी त्यांनी संबंधित कंपनीचा संपर्क क्रमांक मिळवला. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता चोरट्याने माहिती देण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठवली लिंक उघडताच बँक खात्यातून 1 लाख 23 हजार 999 रुपये परस्पर वळवण्यात आले. (Latest Marathi News)
पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तेव्हा बँक खातेधारक पश्चिम बंगालमधील असल्याचे उघडकीस आले. बँक खात्याशी जोडलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेलची तांत्रिक पडताळणी पोलिसांनी केली. तेव्हा तांत्रिक तपासात आरोपी रॉय दिनाजपूर परिसरात असल्याची माहिती मिळाली. पुणे पोलिसांच्या पथकाने त्याला दिनाजपूर परिसरातून ताब्यात घेतले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.