Government Job: नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी अन् १४१००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

National Seeds Corporation Recruitment 2024: नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडेआहे. विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
National Seeds Corporation Recruitment
National Seeds Corporation RecruitmentSaam Tv
Published On

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी १२ वी पास ते पदव्युतर उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. (Government Job)

National Seeds Corporation Recruitment
AOC Recruitment: इंडियन ऑर्डिनेंस कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी, तब्बल ७२३ पदांसाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये १८८ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. डेप्युटी मॅनेजर विजिलेंस पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवाराकडे एमबीए एचआर किंवा एलएलबी पदवी असणे गरजेचे आहे. याचसोबत १० वर्षांचा अनुभव असायला हवा. असिस्टंट मॅनेज विजिलेंस पदासाठी दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एचआर पदासाठी दोन वर्षांचा अनुभव असायला हवा.तसेच विविध पदे भरती केली जाणार आहेत. १२ वी पास/ ITI / डिप्लोमा / बी.कॉम / ग्रॅज्युएट / बीई /बीटेक / बीएससी / एमबीए/ पोस्ट ग्रॅज्युएट पदवीधर उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. (National Seeds Corporation Limited Recruitment)

ट्रेनी, सिनियर ट्रेनी, मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २७ वर्ष असावी. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ३० वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी ५० वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

National Seeds Corporation Recruitment
Government Job: सरकारी नोकरी अन् ८४००० रुपये पगार; BHEL मध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिडेटमध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे भरती होणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २४,६१६ ते १,४१,२६० रुपये पगार मिळणार आहे.

National Seeds Corporation Recruitment
UIDAI Job: सरकारी नोकरी अन् १ लाख ७० हजार रुपये पगार; UIDAI मध्ये भरती सुरु; अर्ज कसा अन् कुठे करायचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com