Mumbai Tragedy: IIT ग्रॅज्युएट तरुणानं संपवलं जीवन; त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं?

A 22 Year Old IIT Graduate Killed Himself: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील एका २२ वर्षीय मुलाने आत्महत्या केली होती. हा मुलगा आयआयटी पदवीधर होता. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
Mumbai Tragedy
Mumbai TragedyYandex

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील एका २२ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केली होती. हा मुलगा आयआयटी पदवीधर होता. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन कुमार पवन झा असे मृत मुलाचे नाव आहे. तो नुकताच आयआयटी कानपूरमधून पदवीधर झाला होता. रोहन हा गेल्या तीन महिन्यांपासून नैराश्यात होता.

रोहन हा बिहारचा असून नोकरीसाठी मुंबईत आला होता. कॅम्प्स प्लेसमेंटद्वारे त्याा मुंबईतील एका विमा कंपनीत चांगली नोकरी लागली होती. त्यानंतर तो मुंबईत दोन मित्रांसह ३ बीएचके फ्लॅटमध्ये राहत होता, असं पोलिसांनी सांगितले.

बुधवारी संध्याकाळी ६ वाजता रोहन स्वयंपाकघरात गेला. त्याने आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर काहीवेळाने स्वयंपाकघराला लॉक असल्याचे त्याच्या मित्राच्या लक्षात आले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

स्वयंपाक घर बंद असल्याने मित्राने दरवाजा ठोठावला. परंतु आतून काहीच प्रतिसाद आला आहे. त्यानंतर त्याने दुसऱ्या मित्राला कळवले.त्यांनी मिळून हा दरवाजा तोडला. यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

Mumbai Tragedy
Mumbai Crime News: पुढच्या महिन्यात मर्चंट नेव्हीमध्ये जॉइन होणार होता, पण त्याआधीच नियतीनं डाव साधला! १९ वर्षांच्या तरुणासोबत काय घडलं?

याबाबत पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आम्हाला घरातून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. गेल्या काही महिन्यांपासून रोहन कोणाशीही फारसा बोलत नव्हता. तो नैराश्येत असल्याचे निदर्शनास आहे. आम्हाला शंका आहे की, त्याने नैराश्येतूनच हे टोकाचे पाऊल उचलले असावे.

Mumbai Tragedy
Akola Crime News: प्रेमात अडसर ठरत होती बायको; नवऱ्याने गाठला विकृतीचा कळस, मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com