LIC Scheme: LIC ची खास योजना! एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

LIC Saral Pension Scheme: एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही दर महिन्याला पेन्शन मिळवू शकतात. एलआयसीच्या योजनेत दर महिन्याला १२००० रुपयांनी पेन्शन तुम्हाला मिळेल.
Lic  Scheme
Lic SchemeSaam tv
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा. तुमच्या भविष्यासाठी ही चांगली योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात पैशाची गरज भासणार नाही.

एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला १२००० रुपये मिळतील. सरल पेन्शन योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची असते.(LIC Saral Pension Scheme)

Lic  Scheme
Post Office Scheme: फक्त व्याजातून २.५४ लाखांची कमाई, पोस्ट ऑफिसच्या या योजनेबद्दल माहिती आहे?

एलआयसीच्या सरल पेन्शन योजना हा उत्तम रिटायरमेंट प्लान आहे. यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक लाभ घेऊ शकतात. यामध्ये तुम्ही PF आणि ग्रॅज्युटी अमाउंट गुंतवू शकता. यामुळे तुम्हाला आयुष्यभर दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळते. (LIC Scheme)

एलआयसीच्या या योजनेत ४० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोक गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त ८० वर्षापर्यंत तुम्ही पैसे गुंतवू शकतात. या योजनेत तुम्ही वर्षाला, सहामाही, तिमाही आणि मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत जर तुम्ही ४२ वर्षाचे असाल तर ३० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला १२,३८८ रुपयांची पेन्शन मिळते.

Lic  Scheme
Atal Pension Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् महिन्याला ५००० रुपये पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजना नेमकी आहे तरी काय?

एलआयसीच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अधिकत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. या योजनेत ६ महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सरेंडर करु शकतात. या योजनेत तुम्ही लोनदेखील घेऊ शकतात.

Lic  Scheme
Government Scheme: फक्त व्याजातून कमवा २४ लाख रुपये; या सरकारी योजनेत मिळते सर्वाधिक व्याज; आजच गुंतवणूक करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com