PF Balance: कंपनी खरंच तुमच्या PF खात्यात पैसे जमा करते का? घरबसल्या या स्टेप्स फॉलो करुन करा चेक

PF Account Balance Check: प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. या खात्यात कंपनी दर महिन्याला काही ठरावीक रक्कम जमा करते. कंपनी खरंच तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा करते का? या सोप्या पद्धतीने करा चेक.
EPFO
EPFOSaam Tv
Published On

प्रत्येक व्यक्तीचे पीएफ अकाउंट हे असतेच. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातील ठरावीक रक्कम जमा केली जाते. ही एक गुंतवणूकच आहे. पीएफ अकाउंटमधील पैशांवर तुम्हाला चांगले व्याज मिळते. पीएफ अकाउंटमध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातील १२ टक्के रक्कम जमा केली जाते.

पीएफ अकाउंटमधील यातील काही पैसे हे कंपनी जमा करते तर काही पैसे हे कर्मचाऱ्याचे असतात. पीएफ खात्यात तुमची कंपनी दर महिन्याला पैसे जमा करते. परंतु कंपनी खरंच तुमच्या खात्यात जमा करते की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात. (PF Account Balance Check)

EPFO
PF Rules: नवीन नोकरी जॉइन केल्यावर जुन्या PF खात्याचे काय होणार? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

पीएफ अकाउंटमध्ये तुमच्या बेसिक पगारातील १२ टक्के रक्कम जमा करतात. त्यातील ८.६७ टक्के हिस्सा पेन्शन खात्यात जातो तर ३.३३ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा होतो.या खात्याचे स्टेटमेंट तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

SMS द्वारे करा चेक (PF Balance Check By SMS)

सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर ईपीएफओ पोर्टलवर रजिस्टर असणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 7738299899 यावर मेसेज करायचा आहे. तुम्हाला <EPFOHO UAN ENG> असा मेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला जर भाषा बदलायची असेल तर तुमच्या भाषेचे सुरुवातीचे तीन अक्षर तुम्हाला शेवटी टाकावे लागतील.

मोबाईल नंबरवरुन करा चेक

तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 9966044425 यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे सर्व माहिती समजेल. तुमच्या ईपीएफ बॅलेंसमधील रक्कम दिसेल.

EPFO
PF: कोण कोणत्या कारणांसाठी काढता येणार PF चे पैसे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

EPFO पोर्टल

सर्वप्रथम तुम्हाला EPFO पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर फॉर एम्प्लॉइज सेक्शनवर क्लिक करा.

त्यानंतर तुमचा बॅलेंस चेक करा यावर क्लिक करा. त्यानंतर यूएएन नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला स्क्रिनवर तुमचचा बॅलेंस दिसेल.

EPFO
EPFO Rule: EPFO सदस्यांसाठी खुशखबर! PF काढण्यासाठी ATM कार्ड या तारखेपासून मिळणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com