Government Schemes For Girls Saam Tv
बिझनेस

Government Scheme : मुलगी लखपती होणार! जन्मावेळी ५०,००० रुपये मिळणार; १८ वर्षांची होईपर्यंत दरवर्षी पैसे मिळणार

Mazi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना जन्मानंतर ५०,००० रुपये मिळतात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींच्या जन्मानंतर पैसे मिळणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींच्या जन्मानंतर त्यांना ५०,००० रुपये दिले जातात. पालकांना हे पैसे दिले जातात. मुलींचा जन्मदर वाढावा तसेच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षांची होईपर्यंत हे पैसे दिले जातात.

गरीब कुटुंबातील मुलींना चांगले शिक्षण मिळावे,या उद्देशातून राबवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत अर्ज करणारी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असावी.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलगी आणि आईच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडले जाते.या योजनेत १ लाखांचा अपघात विमा दिला जातो. त्याचसोबत ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट असतो.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत एका कुटुंबातील फक्त दोन मुली अर्ज करु शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आईवडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर २५०००-२५००० रुपये दिले जातात.

या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना लाभ मिळतो. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये आणि मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये तर मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. याचाच अर्थ असा की तुमची मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर १ लाख १ हजार रुपये जमा झालेले असतात.

या योजनेत दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना लाभ मिळतो. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे जमा करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT